पान:विद्यार्थि धर्म.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


वागण्याची आसुरी पद्धत पाहिली ह्मणजे विद्यार्थिधर्माचा राजरोस खून होत असलेला पाहून वाईट वाटतें व कॉलेजांतील विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणाऱ्यांची या बाबतींतील हयगय कशी जाईल, याचाहि विचार डोळ्यापुढे येतो. विद्यार्थ्यांचा आहार पौष्टिक पाहिजे, तो वीर्य- पोषक पाहिजे व बुद्धिवर्धकहि पाहिजे. अति गोड खाणे, गुळाचे उष्ण पदार्थ खाणे, पुरणपोळी सारखा पदार्थ पुष्कळ खाणें हें अपाय- कारक आहे. शेवगा उष्ण आहे, कांदा उद्दीपक आहे, ह्मणूनच त्यांचा निषिद्ध पदार्थात समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या कोठ्यांत कडकी न वाढेल असा आहार पाहिजे. तूप, दूध, दही, ताजे ताक हे पदार्थ ज्यांना अनुकूल असेल त्यांनी पचतील तितके खावेत. तुपानें मेद वाढतो पण तें बुद्धिवर्धक आहे. दूध, ताजें ताक, लोणी हे पदार्थ सर्व दृष्टींनी उत्तम समजावेत. आहाराचा प्रश्न हा विद्या-च्याहि हाती फारसा असत नाहीं. सुशिक्षित, सुज्ञ, आईबापांनी व पालकांनी विद्यार्थ्याच्या अन्नाची काळजी घेऊन ते दीर्घायुषी होतील अशी तजवीज केली पाहिजे, इतकेंच सामान्यपणें सांगतां येण्यासारखे आहे.

 विद्यार्थ्यांनी नेहमी मिताहारी असले पाहिजे, नेमस्तपणा हेंच खरें आरोग्य आहे. जो मितभुक् असतो तो षड्गुणसंपन्न होतो असे महाभारतांत टलें आहे.

गुणाश्च पण्मितमुक्तं भजते । आरोग्यमायुश्च बलं सुखंच

[ उद्योगपर्व.

 आरोग्य, आयुष्य, बल, व सुख हीं वाहून पुढची संततीहि आळशी निपजत नाहीं व मिताहारी मनुष्याची कोणी निंदा करीत नाहीं. इतके फायदे मिताहारामध्ये आहेत. खरोखर जर पाहिले तर उगीच जिव्हालौल्याकरितां पोटाला तडस लागेपर्यंत जेवण करण्याचे कारण आधाशीपणा व खादाडपणा याशिवाय दुसरे कोणते आहे ? काम करण्यास अंगांत चांगला तकवा