पान:विद्यार्थि धर्म.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन.

६१


 बहुतकरून श्रीमंत लोकांना खाण्याची इच्छा असते, पण पचविण्याची शक्ति नसते. पण दरिद्री माणसे मात्र लांकडे सुद्धां पचवितात, असें महाभारतांत झटलें आहे. याचा मथितार्थ काय आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनाशी पडताळून पहावें.

 विद्यार्थ्यांचे अन्न कसे असावे याचा विचार पुष्कळ सांगतां येण्या- सारखा आहे; परंतु व्यवहारांत वस्तुस्थिति अगदी निराळी आहे. घरामध्यें पांच पंचवीस किंवा दहापांच माणसें असतात. त्या सगळ्यांच्या करितां एक आमटी व दुसरी दामटी असा स्वयंपाक केलेला असतो. तोच सर्वांच्या वाटणीला येतो. त्यांत विद्यार्थ्यांना उपयुक्त कीय, अनुपयुक्त काय, याचा विचार गुरुगृह नसल्यामुळे व दारिद्र्यामुळे होत नाहीं. शिवाय घरोघरी स्वयंपाकांत तसा निराळेपणा येणें शक्यहि नाहीं, तथापि विद्या- र्थ्यांचा आहार शक्य तितका सात्विक, फारतर राजस असावा. तेलकट, जळजळीत तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ, खमंग भाज्या, फोडण्या दिलेल्या कोशिंबिरी, थोडक्यांत बोलावयाचे ह्मणजे भगवद्वर्तित सांगितलेला तामस आहार विद्यार्थ्यांना उपयोगी नाहीं. अन्नाचा व बुद्धीचा निकट संबंध आहे. “अन्नमशितंत्रेधाविधीयते" खाल्लेल्या अन्नाचे तीन प्रकार होतात. त्यांतील सूक्ष्म भागापासून मनाला व बुद्धीला पोषण मिळते, त्याकरितां मूग, गहूं, जोंधळा, चांगले तूप, पातळ भाज्या, बटाटा, कांकड़ी, तुळे, लिंबू, दूधभोपळा, साखर, हेच पदार्थ विद्यार्थ्याच्या भोजनांत शक्य तितके अधिक असावेत. निरनिराळ्या वेळी मिळणारी फळे, भाज्या व इतर खाण्याचे पदार्थ यांचाहि उपयोग विद्यार्थ्याच्या अन्नांत झाला पाहिजे. दारिद्र्याच्या परिस्थितीत या गोष्टीसुद्धां कठीण आहेत परंतु कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या लवांकडे लक्ष्य दिल्यास दारिद्यापेक्षां विद्यार्थ्यांच्या जिभेचा चवचालपणाच जास्त दृष्टीस पडतो. कॉलेजांतील विद्यार्थ्यांचे क्लत्रांतले जेवण, त्यांची व्यवस्था, त्यांचा तो स्वयंपाकी, तेथील विविध प्रकारचें उत्तेजक अन्न आणि