पान:विद्यार्थि धर्म.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण

दिवस न धुतली तरी चालतील. कारण त्यांत विद्युत् पुष्कळ काळ टिकूं शकते. ' 'महावस्त्राला विटाळ नाहीं, या शास्त्रां- तील तत्व हेच आहे. उष्णतेचा आणि सोवळ्याचा अशा प्रकारें संबंध आहे यास्तव आरोग्यरक्षणार्थं सर्वांनीं अवश्य सोवळें नेसावें, भोज- नापूर्वी अन्नस्तुतीचे मंत्र हह्मणावेत; किंवा गीतेंतील 'ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ' श्लोक ह्मणावा. विद्यार्थ्यांनीं भोजनाच्या वेळीं आपापले तांब्याभांडे • वापरावें. भांड्याला तोंड न लावतां पाणी वरून अंतराळी प्यावे. दुसऱ्याच्या उष्ट्या भांड्यानें आपण पाणी पिऊं नये व आपले भांडे दुसऱ्यास उष्टें करूं देऊं नये. भोजनास बसतांनाच : सकाळी भरलेलें स्वच्छ पाणी किंवा विहिरीचें अगर नदचिं ताजे पाणी आपल्या तांब्यांत घ्यावें; आणि प्रसन्न मनानें भोजन करावे, सकाळपासूनच विद्यार्थि- धर्माचे आचरण बरोबर झालेले असलें कीं, चित्त प्रसन्न असते; • मग जेवणहि गोड लागतें.

याकारणें सावधान

[ दासबोध.

 असे श्रीसमर्थ झणतात. एकाग्र मन असले ह्मणजे जसें जेवण गोड लागतें तसेंच चांगली क्षुधा लागलेली असली कीं, "भुकेला कोडा व निजेला घोडा " या हाणीचे प्रत्यंतर येतें. इकडच्या तिक- डच्या खाण्यापेक्षां दोन वेळच्या स्वस्थपणें केलेल्या सात्विक आहाराचें महत्व अधिक आहे. दोन वेळचे भोजन हेंच खरें तुष्टिपुष्टिद । यक आहे. सकाळी थोडे दूध किंवा थोडीशी दशमी घेतलेली असली कीं, दहा अकरा वाजतां चांगली कड़कडीत भूक लागते, व भोज- नाची खरी रुचि कळते. दुपारच्या जेवणापर्यंत दोन वेळ चहा व चार वेळ चिवडा खाल्ला असला ह्मणजे जेवणाचाहि चिवडा होतो ! भूक चांगली नसली की, अन्नाला नांवें ठेवणे, कपाळाला आठ्या घालणे, जेवतांना आळोखेपिळोखे देणे असले सर्व प्रकार सुचत असतात

प्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते । काष्ठान्यपिहि जीर्यते दरिद्राणां परंतप

[ महाभारत.