पान:विद्यार्थि धर्म.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें. ]
भोजन, वर्तन व इतर वाचन.

५९


व शाळाबाई यांची भर पडली! कांहीं विद्यार्थी तर स्वतः अजा- गळ असल्यामुळे स्वतःची व इतरांची इतकी तारांबळ करितात कीं असले विद्यार्थी घरांतून एकदां बाहेर गेले ह्मणजे आईबापांना इडापिडा टळल्यासारखे होतें. कोणत्याहि कामांत दीर्घसूचनेनें वागण्याची सवय नाहीं, हेंच या तारंबळीचें निदर्शक होय.

 अलीकडे साडेदहा किंवा अकराच्या सुमारास जेवायला बसण्याची चाल सामान्यतः आहे, असे धरून चालण्यास हरकत नाहीं. मुंबईतील कांहीं लोक सकाळी आठ नऊ वाजतां जेवतात व कांहीं कांहीं ठिकाण दोनप्रहरी एक अगर दोनही जेवायला वाजतात. हीं दोन्हीं टोकेँ सोडूनच मधली वेळ आम्ही धरली आहे. भोजनास बसतांना विद्यार्थ्यांनी लघुशंका करून, हात पाय तोड स्वच्छ धुऊन सोवळे नेसून बसावे. सर्वजातीचे लोक सोवळें नेसूं लागले तर तें इष्टच आहे. त्यामुळे ब्राह्मणांप्रमाणे इतर वर्गातहि स्वच्छता येईल, व अमंगलपणा आणि घामटपणा हीं जातील. हिंदुस्थान, देशांतील महाराष्ट्र कर्नाटका-सारख्या सम- शीतोष्ण भागांत युरोपियन लोकांप्रमाणे कपडे घालून भोजनास बसण्याचें कारण नाहीं. आरोग्यशास्त्रदृष्ट्या तसें बसणें घातक आहे. युरोपियन लोक कपडे घालून जेवतात; पण जेवणाच्या वेळचा त्यांचा पोषाक निराळा असतो. सोवळें हाणजे तरी जेवणाच्या वेळेचा एक तऱ्हेचा पाषाकच होय. या पोषाकांत धूतवस्त्र हैं सर्वोत प्रशस्त. त्याचे खालोखाल धाबळी, व शेवटी मुकटा; असा अनुक्रम लागेल. हिंदुस्थानांतील सर्व विद्यार्थी धावळी किंवा मुकटा नेसून जेवूं लागले तर त्यांत धर्मशास्त्र व आरोग्यशास्त्रदृष्ट्या फायदा आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्याही देशांत मुकटे व धावळ्या, तयार करण्याला उत्तेजन मिळणार आहे. मुकटे व धाबळ्या वापरणारांनीं तीं वस्त्रे दर पंधरवड्यास धुतलींच पाहिजेत, धूतवस्त्रांतली उष्णता ( विद्युत्) एक दिवसपर्यंत टिकते. पीतांबर व शालजोड्या हीं महावस्त्रे नेहमी वापरण्याचा प्रसंग असल्यास तीं मात्र बरेच