पान:विद्यार्थि धर्म.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण

हैं होय. ज्ञानेंद्रियें ज्ञान मिळविण्याला व कर्मेंद्रियें हीं ज्ञान पचवि- याला उपयोगी आहेत. विशेषतः प्रौढ विद्यार्थ्यांनी या गोष्टीचें मनन करावें आणि शिक्षकांच्या मदतीने चुका सुधारून घ्याव्या इतकेंच सांगून हे प्रकरण संपवितों.

_________
प्रकरण सातवें.
_____००_____
भोजन, विद्यालयांतील वर्तन व इतर वाचन.

 गेल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीं आपला अभ्यास आटोपून भोजनोत्तर थोडी विश्रांति घेऊन विद्यालयास वेळेवर जातां येईल, अशा बेतानें भोजनास बसावें. वास्तविक कोणत्याहि शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाच्या वेळा सकाळीं व दुपारी अशाच असाव्या, ह्मणजे बुद्धीवर सारखा सहा तासांचा ताण पडणार नाहीं. शिक्षणखातें हल्लीं लोकांकडे आलेलें आहे; त्या खात्यांतील प्रतिनिधीनीं प्राथ- मिक व माध्यमिक शाळा तरी सकाळीं आणि दुपारी भरविण्याची योजना करावी; ह्मणजे तरुण पिढीवर बराच उपकार केला असें होईल. विद्यार्थ्यांनीं भोजनास बसण्यापूर्वी विद्यालयांत लागणारी सर्व उपकरणे - पुस्तकें, वह्या, नकाशे, लेखनसाहित्य, नोटबुकें-यांची जय्यत तयारी ठेवावी, ह्मणजे जेवण झाल्यावर धांदल होत नाहीं व त्या धांदलीत कांहीं पदार्थ चुकून रहात नाहींत. हिंदुस्थानांत रेल्वे होऊन बरीच वर्षे झाली, तरी गाडी साधण्याकरितां स्टेशनवर जाण्याचा प्रसंग आला की अद्याप घरांतील बायकांची, स्वयंपाकाची व गांवाला जाणाऱ्याची तारांबळ कांहीं चुकत नाहीं. सकाळीं लवकर जेवून शाळेला जाण्याची पद्धत पडून सुद्धां बरेच दिवस झाले, तथापि विद्यार्थ्यांची धांवाधांव व पळापळ ही कांहीं अद्याप संपत नाहीं. लग्नघाई व घिसाडघाई या पूर्वीच्याच आहेत. त्यांतच रेलवेघाई