पान:विद्यार्थि धर्म.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
न्याहारी व अभ्यास.

५७


युगांत जगावयाचें आहे. नवीन जगाचा नुकताच कोठें हिंदुस्थानाला परिचय झालेला आहे. हिंदीजनता तर नवीन जगाला पाहून भांबावून गेली आहे. अशा स्थितीत अनेक विद्या, अनेक शास्त्र, अनेक कला हस्तगत करावयाच्या आहेत हैं लक्ष्यांत ठेवून विद्यार्थ्यांनी पहिल्या- पासून अभ्यासाच्या चांगल्या पद्धति शिकाव्या व चांगल्या सवयी लावून घ्याव्या. अभ्यास हाणजे नुसता पुस्तकांतील विषय घोकणें असें विद्यार्थ्यांनी समजूं नये. ईश्वरानें मनुष्याला ज्ञानकर्मेंद्रियें दिलीं आहेत. त्यांचा योग्य उपयोग करण्यास शिकणे हाणजे अभ्यास. शाळेबाहेरचें जग हीच खरी शिक्षणसंस्था आहे, समाज, व्यवहार व देश यांत चाललेल्या अनेक उलाढाली मनुष्याला शिक्षण देत असतात. विद्यार्थ्यांनी या जगाच्या शाळेतील आपण विद्यार्थी आहोत, असें समजून ज्ञानकर्मेंद्रियांच्या साधनानें विद्या मिळविली पाहिजे. पुस्तकांत जगांतील थोडेसे ज्ञान सांगितलें असतें. पण जगांतील विविधज्ञानशाखेवरच ग्रंथ होत असतात. पुस्तकांत जग नसून तें बाहेर असतें, हें लक्ष्यांत ठेविले पाहिजे. जगाचें, सृष्टीचे, समाजाचे निरीक्षण करण्यास शिकले पाहिजे. हिंदुस्थान देश कृषिप्रधान, पण प्रत्येकाला शेतीचे कितीसें ज्ञान असते ? जोंधळा, हरभरा, गहूं, या सगळ्यांची झाडे व कणसे पाहिली आहेत असें सांगणारे किती तरी पदवीधर सांपडतील! घाटा, लोंबट, डहाळा असले पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांना माहित असावेत. निरनिराळी धान्यें व धान्यांची पिके ओळ- खर्णे, या गोष्टीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष्य पाहिजे. वैद्यशास्त्रांतील थोडी- बहुत माहिती, वनस्पति व त्यांचे उपयोग, या गोष्टी सामान्य निरीक्षणानें समजतात. पदार्थसंग्रहालय, डोंगर, अरण्य, शहरें, गांव, ग्रंथालयेँ, बाजार, जत्रा या कशा पहाव्यात, यांचे कसें निरक्षिण करावें हें विद्यार्थ्यास विलकुल माहित नसतें. अगदीं बुद्धिमान् स्कॉलर तर बुद्धीशिवाय ईश्वरानें इतर इंद्रियें उगाच दिलीं, असें समजून वागत असतो. कॉलेजाबाहेर स्कॉलर आला कीं तो नाकर्ता होतो. याचें कारण त्याची अभ्यासाची चुकीची कल्पना व पद्धत