पान:विद्यार्थि धर्म.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
विद्यार्थि धर्म.

[ प्रकरण


कांनी व मुलांनीं झोप घ्यावयाची कीं काय ? शिवाय सकाळीं मास्तर, शाळेत मास्तर, रात्रीं मास्तर, असे केल्यानें मुलें लवकर ईयत्तावर ईयत्ता पास होतात असे जरी वाटत असले, तरी तें परिणामी अत्यंत घातक आहे, हें पालकांनी कधीहि विसरूं नये. एकाद्या बैलावर वाजवीपेक्षां फाजील वजन टाकले ह्मणजे तो जसा तोंड वासतो व वांकतो, तीच स्थिति या मुलांची होते, नीट न चावतां गिळलेले अन्न जसें त्रासदायक होते, तसेंच हें शिक्षण आयुष्यहानी करतें. विद्यार्थ्यांना नेहमी दिशा दाखविण्या पुरतीच मास्तरांची जरूरी आहे. विद्यार्थी आजारी पडला, मागचा कांहीं तरी विषय राहिला असला तरच तेवढ्या पुरता मास्तर ठेवणें क्षम्य आहे. विद्यार्थ्यांनी सदोदित आपली जिज्ञासावृत्ति वाढविली पाहिजे. जिज्ञासावृत्ति व उद्योग यानेंच कोणतीहि विद्या प्राप्त होत असते. प्रत्येक ठिकाणी गुरूचें साह्य, प्रत्येक ठिकाणी शिक्षकाची जरुरी लागणे, हें बिन- अकलेचे लक्षण समजावें. गुरूला उपनिषदांत देशिक हाटले आहे. देशिक ह्मणजे दिशा दाखविणारा. गुरूनें सामान्य दिशा दाखविली कीं शिष्यांनी तो विषय आपलासा केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी शोधक बुद्धि असली पाहिजे; ह्मणजे कोणत्याहि गोष्टीचा कार्यकारण संबंध ध्यानांत येतो. गणित विषयांत जशी पद्धति लक्ष्यांत घेतली पाहिजे, कुलुपाला कोणती किल्ली चालते हे जसे समजून घेतले पाहिजे; तसें कोणत्याहि विषयाचें वर्म समजून घेण्या- कडे व शोधण्याकडे मनाचा कल पाहिजे. स्वतःच्या प्रयत्नानें मिळविलेले ज्ञान व ठरविलेले सिद्धान्त यांत जी भेसळ असेल तेवढी नाहींशी करण्यापुरतेच शिक्षकाचें साह्य घ्यावें. विद्यार्थ्यांनी अभ्या- साची अशी सवय लावून घ्यावी; ह्मणजे ते जन्मभर विद्यार्थी रहातील व त्यांची जिज्ञासावृत्ति मरेपर्यंत कायम राहून त्यांच्या हातून मोठे शोध होतील. पाश्चात्यांची प्रबळ जिज्ञासा, शोधकता, चिकाटी, उद्योग हे त्यांना नवीन शास्त्रीय युगांत पुढे येण्यास कारणीभूत झालेले आहेत. हिंदुस्थानाला भावी काळांत शास्त्रसंपन्न