पान:विद्यार्थि धर्म.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावे. ]
न्याहारी व अभ्यास.

५५


सारांश काढून ठेवण्याची सवय असावी. याप्रमाणें मुख्य मुख्य इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषाचें व इतिहास, भूगोल, गणित या विषयांचे दोन तास मनन झाले ह्मणजे मग लेखनाकडे वळावें. दररोज कांहीं तरी लिहिण्याचा विषय असतोच. कांहीं विद्यार्थी सकाळचा पहिला चांगला वेळ लिहिण्यांत घालवून इतर अभ्यास झाला नाहीं ह्मणून हाका मारीत बसतात. ह्मणून सर्वसामान्य लिहिणें हैं नंतर करावें. अक्षर मोकळे मोकळे स्वच्छ थोडक्यांत ' बहुवारिक तरुणपणीं । कामा- नये झातारपणीं । मध्यस्थ लिहिण्याची करणी । करीत जावी || भोवतें स्थळ सोडून द्यावे । मध्ये चमचमीत लिहावे' असें दासबोधांत सांगि- तल्याप्रमाणे असावें. लिहितांना पालथें पडून कधीही लिहू नये. वेळा- पत्रकाप्रमाणें प्रत्येक तासाचें जें लिखाण असेल तें चांगलें लिहून काढावें व नेहमी जय्यत तयारी करून शाळेस जावें. अभ्यास ह्मणजे विषय पचनी पाडण्याची क्रिया होय. कोणताही विषय लिहिण्यानें चांगला पचनी पडतो. कोणताही विषय लिहावयाचा ह्मणजे त्याचें चांगलेच मनन करावें लागतें. मनन पूर्ण झालें कीं विषय हस्तगत होतो. लेखनोपकरणें नेहमी चांगलीं ठेवावीं ह्मणजे लिहावयाला उत्साह येतो. तीं शक्य तोवर पूर्ण स्वदेशी असावीत. अभ्यासाचे वेळीं वर्तमानपत्रे किंवा कादंबऱ्यासारखे चुरचुरति वाङ्मय कधीही वाचूं नये. अभ्यास कसा करावा ही गोष्ट पालकांनी विशेषतः शिक्षकांनी मुलांना नीट समजून दिली पाहिजे. तशा प्रकारचे शिक्षण दिलें जात नाहीं ह्मणून मुलांची कुचंबणा होते. अलीकडे शाळांत एक मोठा रोग सुरू झाला आहे. तो हाटला ह्मणजे खासगी शिकवण्यांचा होय. मुलगा शाळेत जावयास लागल्यापासून खासगी शिक्षक ठेव- ण्याची एक वाईट चाल पडलेली आहे. त्यामुळे मास्तरकीचा धंदा चांगला चालतो एवढें खरें पण मुलांचे फार नुकसान होतें. ती परावलंबी बनतात व स्वतः प्रयत्न करण्याची बुद्धि त्यांना केव्हांही उत्पन्न होत नाहीं. पालक असा विचार करीत नाहींत कीं घरीं ज मास्तर ठेवून मुलांना शिकवावयाचे तर मग शाळेंत जाऊन शिक्ष-