पान:विद्यार्थि धर्म.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्कुलांतील पांचव्या सहाव्या ईयत्तेला टेक्स्टबुक् हाणून व कॉले- जांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ह्मणून हे पुस्तक संग्राह्य व्हावें, अशा इच्छेने प्रयत्न केला आहे. तो कितपत साधला आहे, हें ठविण्याचे काम तज्ज्ञांचे आहे.


 प्रत्येक मनुष्य विद्यार्थिदशेतून गेलेलाच असतो.प्रत्येकानें विद्यार्थिदशेतील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजेत. हें आजपर्यंत न केलेले कार्य या पुस्तकांत केलें आहे. हेंच या पुस्तकाचें वैशिष्टय आहे. जुने आश्रम गेळे, गुरुगृहे गेलीं, तथापि आजच्या बदलेल्या स्थितीत हि जुन्या ग्रंथांतील ब्रह्मचर्याश्रमविषयक बरीच तत्त्वें किती व कशीं उपयुक्त आहेत, हें या पुस्तकावरून समजेल. गृहशिक्षणाचा अभाव, परंपरेचा लोप आणि जुन्या निग्रही रहाणीचा दुर्मिळपणा, अशा स्थितीत होतकरू तरुणांना या पुस्तकाचा बराच उपयोग होईल. समजून उमजूनसुद्धां चांगल्या गोष्टींचें आचरण होत नाहीं, याचें कारण विद्यार्थिदशेत चांगल्या सवयी जडत नाहीत, हेंच होय. शिक्षकांना आणि पालकांनाहि एका दृष्टीनें या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. त्यांनी हें पुस्तक नीट वाचून 'त्या बरोबर आपल्या अनुभवाच्या कांहीं सूचना तरुणांना केल्यास भावी पिढीला त्यांचा फार उपयोग होईल.

 आभार - प्राज्ञपाठशाळेतलि पंडितवर्ग, शिक्षकवर्ग, बेळगांवचे श्री. पुंडलिकजी व छापखान्याचे मालक रा. ठाकूर या सर्वांची पुस्तक लिहण्याच्या तयार करण्याच्या व छापण्याच्या काम अत्यंत मदत झाली ह्मणूनच हें पुस्तक बाहेर पडले. शेवटी है विद्यार्थ्यांचे ऋण फेडण्याचा सुयोग आज आला, या बद्दल अनन्य- भावाने जगन्नियंत्यास सहस्त्रप्रणाम करून ही प्रस्तावना संपवितो.

विजयादशमी १८४७

महादेवशास्त्री दिवेकर.
प्राज्ञपाठशाळा मंडळ वाई,