पान:विद्यार्थि धर्म.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
विद्यार्थि धर्म.

[ प्रकरण


खोल्यांमध्ये व अभ्यासाच्या जागेमध्ये कांहीं विपरीत प्रकार आढळतात. कांहीं विद्यार्थ्यांच्या खोल्यांतील केर आठ आठ दिवस निघत नाहीं. कोळिष्टकांची झुमरें इतकी वाढलेली असतात, कीं डोळे उघडे ठेवून निजण्याची सोयच नसते. ढेकूण तर मुंग्यासारखे तरतर धांवत असतात. त्यांना भिंतीवर चिरडून चिरडून त्यांच्या कत्तलीची जणू खूणच की काय ह्मणून रक्ताचे पट्टे भिंतीवर ओढलेले दिसतात. रॉकेलच्या दिव्यानें बहुतेक कोनाडे काळेकुट्ट झालेले असतात. खोली लावून व रात्रभर दिवा ठेवून निजण्याची सवय असल्यावर मग जिकडे तिकडे काळ्या रंगाचाच प्रकाश पडत असतो. असला अडाणी, अजागळ, अस्वच्छ, तरुण विद्यार्थिवर्ग राष्ट्रोद्धार करणार, हैं कोणास खरे वाटेल ?

 विद्यार्थ्यांचा दुसरा एक वर्ग आहे. त्यांच्या खोल्यांत अस्वच्छता फारशी दिसत नाहीं. परंतु चहाचा स्टोव्ह, इतर साहित्य, मोठाले एक दोन आरसे, हजामतीचीं सलूनच्या धर्तीवर हत्यारें आढळतात. एका खुंटीला एक झगझगीत चटकचांदणी हातांत कॉमिनिया ऑईलची बाटली घेऊन उभी आहे, तर दुसऱ्या खुंटीवर एक विवस्त्र अशी रविवर्म्याची फटाकडी लटकत आहे. एका स्वांत्राशेजारी चित्तक्षोभकारक एकादें कॅलेंडर हातांत घेऊन बसलेली बाई दिसते तर दुसऱ्या खांबाशी नाटकांतील स्त्रीभूमिका घेणाऱ्या नटांचे फोटो दिसतात. पुस्तकांमध्यें नाटक कादंबऱ्यांचाच वराचसा भरणा असतो. विद्यार्थ्यांच्या खोलींत हा देखावा पाहिला तर गालफडे बसलेले, डोळे आंत गेलेले, कंबरेचा कांटा ढिला झालेले असे जे विद्यार्थी दिसतात; त्याच्या कारणमीमांसेची साक्ष तेव्हांच पटते. हिंदुस्थानासारख्या परतंत्र देशांतील रंगेल व फक्कड विद्यार्थी पाहून फार वाईट वाटतें. ज्या वयांत नसते चोचरे नकोत त्या वयांत हे विद्यार्थी मूर्खपणाने कसा आयुष्याचा नाश करीत आहेत त्याचें चांगले प्रत्यंतर येतें, विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्यधर्माचे नीट मनन न केल्यामुळे आणि त्यांना त्याचें महत्व न कळल्यामुळे असा प्रकार