पान:विद्यार्थि धर्म.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
न्याहारी व अभ्यास.

५१


अभ्यासाच्या जागेत प्रकाश उत्तम असावा. सूर्य किरण दररोज आंत आले तर उत्तमच. विद्यार्थ्यांनी प्रकाशाचा किंवा किरणांचा प्रवाह अगदी डोळ्यांवर घेऊन कधीं अभ्यासास बसू नये. जरा तिरपें ह्मणजे प्रकाश पुस्तकावर चांगला पडेल असें बसावें. लिहिण्याकरितां लहान लेखन फलक ( डेस्क ) असावा. तो नसेल तर विद्यार्थ्यांनी वळकटी पुढे ठेऊन लिहावे. अभ्यासाच्या जागेत पुस्तकें, कपडे, छत्री, दिवा, जोडे, पाणी पिण्याचीं भांडी वगैरे सर्व पदार्थ अगदीं जेथल्या तेथे असावेत. भिंतींना सफेती द्यावी किंवा शेणमातीनें त्या स्वच्छ सारवाव्या. विद्यार्थ्यांनी दर आठ दिवसास निदान पंधरा दिवसास तरी आपली खोली स्वच्छ सारवावी. त्याबरोबरच भिंतीवरूनही चांगला केरसुणीनें हात फिरवावा. आढ्यावरची किंवा पाटणीला लागलेली कोळिष्टकें स्वच्छ झाडावीत. आठदहा दिवसांनी पुस्तकें सुद्धां बाहेर उन्हांत ठेवावीं. बिछाने उन्हांत टाकावेत ह्मणजे ढेकूण जास्त होत नाहींत. तसेंच भिंती, खांब यांच्या फटींतील ढेकूण व त्यांची अंडी असतील तीं सुनें खरकटून साफ नाहींतशीं करावीत. चिलटें, पिसवा, ढेकूण, डांस हे न होतील अशी खबरदारी बाळगावी. विद्यार्थ्यांच्या खोलींत कोणत्याही प्रकारची घाण असूं नये. सर्वत्र स्वच्छता व प्रसन्नता, उत्साह व हुरूप यांचेच साम्राज्य असलें पाहिजे. विद्यार्थ्यांचे अंथरूण साधे व सुटसुटीत असावें हाणजे थोडक्यांत शिपाईगिरी थाटाचा त्यांचा बिछाना असवा. गाद्या, गिरद्या, लोड, तक्ये, आराम खुर्च्या यांची विद्यार्थ्यांना बिलकुल गरज नाहीं. विद्यार्थ्यांच्या खोलींत राष्ट्रभक्तांचे फोटो आणि मारुती, रामदास, शंकराचार्य अशा विभू- तींच्या व देवदेवतांच्या चांगल्या तसबिरी असाव्यात. विद्यार्थ्यांनी पहाटेपासून प्रातराशापर्यंतचें सर्व आन्हिक आटोपून आपल्या खोलीं- तील देवतांच्या तसविरींवर गंध फूल वाह स्वतः गंध लावून अभ्यासास बसावें. चंदनाचे गंध हेच सर्व गंध लावण्याची चांगले आहे. रव्याचें चाल अगदीं बाईट पुष्कळ विद्यार्थ्यांच्या