पान:विद्यार्थि धर्म.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावे. ]
न्याहारी व अभ्यास.

४९


कीं, अगदी सोवळ्या बाया हा चहा अगदीं सोंवळा समजून पितात. सोवळ्या बायांत चहा घुसला ह्मणजे तो ब्रह्म- देवाच्या हि बाहेर निघत नाहीं. लहानपणीं विद्यार्थ्यांना ज्यांच्या गोवा गंगेवर गेल्या आहेत, अशा ह्माताऱ्याच चहा पिण्यास शिकवितात; अशी वस्तुस्थिति आहे. भारतीय तरुणांना जळीं, स्थळीं, काठीं, पाषाणी असणाऱ्या परमेश्वराप्रमाणे सर्वत्र चहा भासत असतांना त्याचा मोह त्यांनी कसा आवरून धरावा, हा एक मोठा प्रश्नच आहे. विद्यार्थ्यांना लहानपणीं कळत नसतें, तेव्हां चहाचें व्यसन लागतें. पुढें दुष्परिणाम कळतात, पण जडलेलें व्यसन कांहीं केल्या सुटत नाहीं. विद्यार्थ्यांचें हें चित्र पाहिले ह्मणजे त्यांच्याबद्दल अनुकंपा उत्पन्न होते. एकदां मनुष्य चहाबाज झाला की मग त्याला कांहीं ताळतंत्र रहात नाहीं. घरांत चहा न मिळाला तर दुकानांत जावेसे वाटते, विद्यार्थ्यांच्या जवळ पैसे नसले कीं उसने वे, नांवावर लिहिण्यास सांग व पुढे चोऱ्या कर, इतक्या थरापर्यंत ही गोष्ट येते. दुकानांत जाऊन चहा पिण्याची संवय लागली की, स्वच्छतेच्या कल्पनांना पहिल्याने सोडावे लागतें. दुकानांतील कप बशीला कुणाचें बरें तोंड लागलेले नसतें ? अनेक प्रकारच्या रोग्यांची लाळ त्या भांड्यांना लागलेली असते. दुकानांत ही भांडी विसळण्याची तन्हा कशी असते हें पाहिले की अंगावर कांटाच उभा रहातो. सगळीं भांडी एका महापात्रांत बुचकळून वर काढण्यांत येतात !! स्टेशनवरील चहा देणारे तर अमावास्या पूर्णिमेला स्नान करणारे, पाणी न घेतां शौचास जाणारे व पंधरा दिवसांनी कपडे बदलणारे असे असतात. त्यांच्या हातचा चहा घेण्यास चहावाजाला कांहींच वाटत नाहीं. इतका त्यांच्या स्वच्छतेच्या कल्पनेत फरक पडतो. व्यसनाच्या परि- पूर्तीस्तव स्वदेशीविदेशी साखर, स्वच्छता व अस्वच्छता या सर्वांस तो मनुष्य पारखा होतो. चहाची तलफ आली की त्या माणसाला मग कांहीं सुचेनासें होतें, सगळे विचार बाजूला रहातात, डोके दुखूं लागतें आणि मग चहा करणारा कितीही अमंगळ असला, चहा