पान:विद्यार्थि धर्म.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


आहोत; परंतु येथे केवळ विद्यार्थ्यांच्याच करितां विचार करावयाचा असल्यामुळे त्यांना या व्यसनापासून कांहीं काल थोडे दूर राहण्यास सांगणें हें आमचें कर्तव्य आहे, असें आह्मी समजतों. मनुस्मृतीमध्ये वर्जयेन्मधुमांसच गंधं माल्यं रसान् स्त्रियः । शुक्तानि यानि सर्वाणि प्राणिनांचैव हिंसनम् ॥ १७७ || अशा वर्ज्य गोष्टी सांगि- तलेल्या आहेत. मद्य, मांस, गंधमाल्य वगैरे उत्तेजक पदार्थ, स्त्रिया, प्राण्यांची हिंसा हीं विद्यार्थ्यांनी वर्ज्य केली पाहिजेत. श्लोकांत शुक्तानि असे एक पद आहे. त्याचा अर्थ आंबलेले पदार्थ असा कोणी करतात. पण त्यापेक्षां मादकपदार्थ हाच अर्थ सरस दिसतो. विद्यार्थ्यांनीं मादकपदार्थाचे सेवन करूं नये असे धर्मशास्त्र सांगतें, चहा हा एक मोठा मादक पदार्थ आहे; ह्मणून विद्यार्थ्यांनी विद्या- दिशा संपेपर्यंत तरी निदान चहाला स्पर्श करूं नये, चहासारखें उष्ण पेय दररोज पोटांत गेल्याने छाती जळते. आंतड्यांतील दीपन- शक्ति कमी होते व वीर्यस्थानावर त्याचा परिणाम होऊन वीर्य दुर्बल होतें. दृष्टीला मांद्य येतें. शुक्राळा ओज असे दुसरें नांव आहे. ओज दुर्बल झाले की त्याचा परिणाम हृष्टीवर होतो. सारांश चहा- पासून अनेक अनर्थ होतात.

 या जगांत दारूसारखे भयंकर व्यसन नाहीं. परंतु अशा भयंकर व्यसनाचा त्याग महायुद्धाच्या वेळीं इंग्लंडने केला. स्वराज्योन्मुख झालेल्या भरतखंडांतील तरुणांनी ज्यांच्या कित्येक पिढ्या अट्टल दारूबाज होत्या त्यांनी गेल्या महायुद्धाच्या वेळीं जो घडा घालून दिला तो निदान चहा सोडण्याच्या बाबतींत तरी गिरवावयास नको काय ? दारूचे व्यसन जर सुटतें तर चहाचें सुटणार नाहीं काय ? खात्री सुटेल. फक्त पालकांनी व विद्यार्थ्यांनी निश्चय केला पाहिजे. परंतु हिंदुस्थानांतील आईबापांचे शिथिल वर्तन या बाबतीत विद्यार्थ्यांना भोंवतें, आईबाप आधीच चहा पितात, पोरांच्या देखत पितात, आणि पोरांना चहा पाजत पाजत ते चहा पितात. मुलीबाळी चहा पितात, झाताऱ्या कोताऱ्या चहा पितात. आश्चर्याची गोष्ट ही