पान:विद्यार्थि धर्म.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
दिनचर्या, न्याहारी व अभ्यास.

४७


बरोबर अगर बेदाण्याबरोबर चांगल्या चावून चावून खाव्या. तूपसाखर व पिवळ्या मुगाचें खमंग भाजलेले पीठ घेऊन त्याचा लाडू करून खावा. रव्याचा लाडू खोबरें घातलेला, हा त्याहिपेक्षां उत्तम. सत्यनारायणाच्या प्रसादासारखा चांगला शिरा अर्थात् चांगल्या तुपाचा विद्यार्थ्यांनी मिळाल्यास दररोज खावा. अलीकडे डॉक्टर लोक ताकाची फार स्तुति करूं लागले आहेत. रवीखालचें ताजें उष्ण ताक मिळेल तर फारच उत्तम. लोणी काढलेले अगदी ताजे ताक धारोष्ण दुधाप्रमाणे कोमट असतें व त्या योगानें दीपन पाचनही चांगले होतें. लोणी व खडीसाखर अगर चांगला पेढा हेही पदार्थ संपन्न आईबापांनी मुलांना द्यावेत. हे सगळे पदार्थ श्रीमंतीचे दिसले तरी खर्चाच्या दृष्टीने काळजीपूर्वक केल्यास त्यांना फारसा खर्च येणार नाहीं, पोरांबाळांच्या घरांत हे असले पदार्थ नियमित सर्वांना मिळणें जरी कठिण असलें तथापि मध्यम स्थितीच्या पोरांबाळाचे फारसे लटांवर नसलेल्या आईबापांना हे पदार्थ देणे कांहीं अशक्य नाहीं. खर्च थोडा व फायदे फार असा हा प्रातराशाचा प्रकार आहे.

 दुर्दैव आमचें किंवा साडेसातीचा फेरा असा बलवत्तर कीं, आमच्या हातांत असलेला हिरा टाकून आली गारगोटी घेतों, चांदी फेंकून देऊन शिंपलीला कवटाळतों, धान्याचे कण फेकून देऊन कोंड्याच्या मागे लागतों. हाय! हाय !! केवढा हा अनर्थ आणि केवढे हे अज्ञान ! !! हिंदुस्थानांतील पालक आणि विद्यार्थी प्रातराशाकरितां चिंतामणीसारखे किंवा कल्पवृक्षासारखे असलेले अनेक पदार्थ सोडून पाश्चात्य संस्कृतीबरोबर आलेला, मद्याच्या व्यसनाप्रमाणें प्रसार पावलेला, डॉक्टरांच्या व इतरांच्या अनुभवावरून आरोग्यदृष्ट्या, ब्रह्मचर्यदृष्ट्या क्षयकारक असलेला असा चहा सेवन करूं लागले आहेत. पुष्कळ लेखकांनीं, वक्त्यांनीं व डॉक्ट- रांनी अनेक तऱ्हेने चहाचे दुष्परिणाम दाखविले असतां अद्याप या पेयाची परागति न होतां प्रगतीच होत आहे, हें आह्मी जाणून