पान:विद्यार्थि धर्म.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


पालकांना सुद्धां आपल्या मुलांना दूध देतां येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या इतर गरजा कमी करून दूध पिण्याचाच हट्ट धरावा.

 दररोज दूध पिणे हा प्रातराशाचा नियम शक्य व अव्यवहार्य ठरला तर विद्यार्थ्यांनी सकाळी मिळाल्यास ताजी निदान रात्र करून झांकून ठेवलेली गव्हाची चपाती, जोंधळा व बाजरी यांची भाकरी किंवा दशमी थोडेसे तूप घेऊन खावी. वरीलपैकीं ताजा नाहीं तर नाहीं, पण शिळा पदार्थ मिळणें कांहीं अशक्य नाहीं. पण शिळ्या अन्नानें बुद्धिमांद्य येतें, एवढे लक्ष्यांत ठेवले पाहिजे. दुधाच्या खालो- खाल भाकरी किंवा चपाती, यांच्या वरच्या दरज्याचा पदार्थ झटला हणजे ताजा भात हा होय. बुद्धीच्या दृष्टीनेंहि हा पदार्थ चांगला. आहे. दळणवळणाची साधनें हल्लीं वाढल्यामुळे तांदुळाचे महत्त्व सर्वत्र सारखेच झाले आहे. घरोघर सकाळीं ताजा भात खाण्यास विद्यार्थ्यांस कोणतीहि नड नाहीं, भात, भाकरी किंवा चपाती पदार्थ सकाळीं खातांना त्यांच्याशीं दूध, दही, तूप, लोणी यांचा यथाशक्ति उपयोग करावा. परंतु चटण्या कोशिंबिरी यासारखी तामसी भंजनें फारशी तोडीं लावू नयेत. सकाळीं उठून लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना कधीं चिवडा, शेव, चुरमुरे, थालीपीठ, भजीं असले दुष्ट पदार्थ बाजारचे विकत आणून देण्याचा आईबापांना नेहमी मोह होत असतो; तो त्यांनी अर्थात् आवरून धरला पाहिजे. दुष्टान्न सेवनानें आयुष्य कमी होतें हें लक्ष्यांत ठेवावें आणि वरील पदार्थ नित्य न देतां त्यांत सकाळीं विल्कुल न देतां दररोज न देतां फारतर तिसरे प्रहरीं केव्हां केव्हां घर्ती तयार करून द्यावेत. सकाळीं दूध, ताजा भात, भाकर किंवा चपाती हेच पदार्थ न्याहारीला सर्व दृष्टीने योग्य असे आहेत. यापेक्षां सर्व साधारण, सर्वांना शक्य व सर्वसुलभ असे पदार्थ नाहींत, परंतु ज्या पालकांची व विद्यार्थ्यांची परिस्थिति यापेक्षां थोडी संपन्न असेल त्यांच्याकरितां आणखी तीन चार पदार्थ सांगता येतील. दररोज सकाळीं पांच सात बदाम भिजत घालून ते चांगले सोलून त्याच्या भिरड्या खडीसाखरे