पान:विद्यार्थि धर्म.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
दिनचर्या, न्याहारी व अभ्यास.

४५


हाटले आहे. गाईचे दूध प्याल्याने गाईच्या वासराप्रमाणे विद्यार्थी बुद्धीनें व शरीराने तल्लख होतात. हिंदुस्थानामध्ये हल्लीं सरकारकडून गाईंर्चे रक्षण होत नसल्यामुळे आणि दरसाल दुष्काळाचें रौद्रमुख उघडत असल्यामुळे बरेचसें गोधन नष्ट होत आहे. प्राचीन- काळी गोधनाची किंमत फार होती. वैश्यांचें तर गोरक्षण हें कर्तव्यच सांगितलें होतें. गोधन गेलें, गोरस दुर्मिळ होऊं लागला, तरुण पिढी पोटांत गोरस न गेल्यामुळे वीर्यहीन होऊं लागली, असा प्रकार आज ढळढळीत दिसत आहे. विद्यार्थ्यांनी दूरवर विचार करून आणि गोरक्षणाच्या चाललेल्या चळवळी लक्ष्यांत घेऊन सकाळीं प्रातराशाकरितां गोरस पिण्याचाच निश्चय करावा. सर्व विद्यार्थ्यांना गोरसपान करणें अशक्य आहे हैं आह्मी जाणतोंच; परंतु ज्यांच्या घरीं नोकर चाकर आहेत, गाड्या घोडी आहेत, मोटारी सायकली आहेत, ज्यांची प्राप्ती दरमहा ३०० पासून ५०० पर्यंत आहे, जे समाजांत धुरीण ह्मणून गाजले जात आहेत, अशा प्रतिष्ठित व खाऊन पिऊन सुखी असलेल्या गृहस्थाच्या मुलांनाही सकाळीं गाईचे दूध पिण्यास मिळू नये, यासारखी शोचनीय गोष्ट कोणती ? संपन्न आईबापांच्या मुलांनीं तरी गोरस पिण्याचाच हट्ट घ्यावा. इतक्या सगळ्या खर्चात एकाद्या गायींचा खर्च जास्त आहे असा भाग नाहीं. गायीचे दूध न मिळाल्यास हाशीचें दूध प्यावें तें नच मिळाल्यास शेळीचें दूध प्यावे, शेळी किंवा मेंढीचे दूध त्यांच्या पोटांत अनेक प्रकारच्या वनस्पति जात असल्यामुळे फारच चांगलें असतें; ह्मणून तें पहिलवान लोक पितात. विद्यार्थ्यांनीं गोरस मिळा ल्यास उत्तम, ह्राशीचे दूध मध्यम, व शेळीचे दूध कनिष्ठ असें समजावे. दूध धारोष्ण नाहीं तर नाहीं निदान तापवून दूध प्या शुद्ध दूध प्या आणि दूधच प्या असें आह्मी विद्यार्थ्यांना सांगतो.

 दररोज सकाळीं पावशेरभर दूध पिणें ही कांहीं अशक्य गोष्ट नाहीं. रेल्वे, टपाल, मोटारी, कपडे, खेळणीं व इतर चैनीच्या गरजा यांप्रीत्यर्थ जो खर्च होतो तो जरा कमी केला तर मध्यम स्थितींतील