पान:विद्यार्थि धर्म.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


बलदायक, आणि उत्साहवर्धक आहे. ब्राह्मणेतरांची ही चाल ब्राह्मणांनी घेण्यासारखी आहे. ब्राह्मणसमाजामध्ये कांहीं कांहीं घरी लहान मुलांना सकाळीं ताजें अन्न जेऊ घालतात. पण सर्व शाळा अकरा वाजता सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या खाण्याकडे दुर्लक्ष्य होत आहे. लहान मुलांना जसा ताजा भात खाऊं घालण्यांत येतो, तशीच विद्यार्थ्यांनाही ताजी दशमी किंवा सोजी देण्यांत यावी. ब्राह्मणांच्या घरीं कदाचित सोंवळ्याओवळ्याची व पारोशा आरोशाची पंचाईत पडत असेल, पण विद्यार्थी जर प्रातःस्नान करूं लागले तर वरील अडचण पडणार नाहीं. इतकेच नव्हे तर घरांतील आई, बहीण, भावजय, आत्या, मावशी यांना आपली मुलें सकाळीं उठतात, स्नान करतात, नमस्कार घालतात, हें पाहून सकाळीं उठून कांहीं तरी ताजें साधे अन्न करून देण्याची इच्छा त्यांना झाल्यावांचून रहाणार नाहीं. सकाळीं नित्य नेमाने जर न्याहारी करावयाची असेल आणि जर कांहीं ताजा पदार्थ पाहिजे असेल तर हल्लीच्या दारिद्यांतसुद्धां जोंधळा, बाजरी, गहूं व तांदूळ या धान्यांपैकी जे धान्य नेहमीं देशपरत्वें व ऋतुपरत्वें खाण्याचा प्रघात असेल, त्याचा कोणताही साधा पदार्थ मिळणे अशक्य नाहीं. अब्राह्मण समाजामध्ये कोणताही मनुष्य किंवा मुलगा बाहेर कामावर निघाला ह्मणजे त्याला आधीं ताजी अगर शिळी भाकर न्याहारीस देण्यांत येते; शिवाय तो बरोबर शिधोरी बांधूनही घेऊन जातो. सोवळ्या ओवळ्याच्या किंबहुना स्वच्छतेच्या कल्पना त्यांच्या निराळ्या असल्यामुळे त्यांना चटकन् चूल पेटवून भाकरी करून देण्यास व स्नान न करितां ती खाण्यास कांहीं अडचण पडत नाहीं, हें खरें. ब्राह्मण समाजामध्ये स्नान व सोंवळे या दृष्टीनें थोडीशी अडचण जरी वाटली तरी तिचे निराकरण कसें होईल हें वर सांगितलेच आहे.

 प्रातराशास विद्यार्थ्यांना उत्तम पदार्थ हाटला ह्मणजे ताजे गाई धारोष्ण दूध हें होय. दूध हें मृत्युलोकांतील अमृत आहे. हें ब्रह्मचर्याचें जीवन असल्यामुळे " सद्यः शुक्रकरं पयः " असे आयुर्वेदांत