पान:विद्यार्थि धर्म.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

.

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या निधीकरितां प्रचार कारतेवेळीं शिक्षणसंस्थांमध्ये जाण्याचा वरचेवर प्रसंग येई. विद्यार्थ्यांना उद्दे- शून कांहीं सांगार्वेहि लागे. माजी समर्थविद्यालय व प्राज्ञपाठ- शाळा या दोन संस्थांतील वसतिगृहाची रहाणी चांगली परिचित असल्यामुळे तेथीलच गोष्टी निराळ्या स्वरूपांत प्रथम प्रथम आह्मी सांगत होतों. शके १८३८ च्या मार्गशीप्रीत उमरावती येथे हिंदु- हायस्कुलांत विद्यार्थिधर्म या विषयांवर पहिले व्याख्यान दिलें. तें हेडमास्तर श्री. देवभानकर व प्रो. शि. ह. गोखले ( जबलपूर ) या उभयतांना फारच पसंत पडले, त्यानंतर ठिकठिकाणच्या हाय- स्कुलांत, मिड्ल्स्कुलांत व केव्हां केव्हां कॉलेजच्या वसतिगृहांमध्यें विद्यार्थिधर्म या विषयावर व्याख्याने द्यावीं लागली. पुष्कळ श्रोत्यांनीं शिक्षकांनीं व विद्यार्थ्यांनी पुस्तकरूपानें हा विषय छाप- ण्याबद्दल सूचनाहि केल्या. परंतु तो योग आजपर्यंत जुळून आला नाहीं.
 खरोखरच विद्यार्थ्यांना उपयुक्त ह्मणजे विद्यार्थिधर्माचें विवेचन करणारी पुस्तके मराठीत नाहींत. कॉलेजांतील विद्यार्थ्यांना वाचनीय व हायस्कुलांतील व राष्ट्रीय शाळांतील विद्यार्थ्यांना वर्गात लावण्यास उपयोगी अशा प्रकारच्या पुस्तकाची फारच जरूर आहे. आमच्या मनांत पहिल्याने या विषयावर एक लहानसा निबंधच प्रसिद्ध करावयाचा होता. तो शके १८३९ च्या भाद्रपद महिन्यांत गोगांव येथे मातुलगृहीं लिहूनही काढला. परंतु तेवढ्याने समाधान वाटेना. पुढे पुढे पुस्तकच लिहावें असें वाटू लागलें.
 पुस्तकाच्या कल्पनेला मूर्तस्वरूप येण्यास आमचे मित्र हिंदी- प्रचारक श्री. पुंडलीकजी कातगडे हे कारणीभूत झाले. त्यांच्या आग्रहामुळे रा. ठाकूर यांच्या ' तरुण भारत' मासिकांत या विष- याचा कांहीं भाग खंडशः प्रसिद्ध झाला. तो भाग आणि पांच सहा अधिक प्रकरणें मिळून बरीच फिरवाफिरव करून हें पुस्तक अगदी नवीन असेच तयार केलेले आहे. राष्ट्रियशाळांतील व हाय-