पान:विद्यार्थि धर्म.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावें. ]
दिनचर्या, न्याहारी व अभ्यास.

४३


रोग या आसनांपासून नाहींत से होतात. 5 अशक्त विद्यार्थ्यांनी उघड्या हवेंत झट्झद् चालत जाण्याचा क्रम ठेवावा. सशक्तांनीं पळावयास जावें. कोणाला तालमीचा, डंबेल्सचा अथवा घोड्यावर बसण्याचा किंवा कोणत्याहि प्रकारचा व्यायाम करण्याचा शोक असेल तर तो त्यांनी करावा. व्यायामावांचून बिलकुल राहूं नये. व्यायाम ही अमरवल्ली आहे. सकाळचा व्यायाम हा फारच चांगला. व्यायामाचे महत्व काय आहे हे सांगण्यासारखें हें स्थळ नव्हे; हाणून स्नानानंतर नमस्कार किंवा दुसरा कोणताही घाम येण्या- सारखा व्यायाम विद्यार्थ्यांनी करावा इतकें सांगून हे प्रकरण संपवितों.

_______
प्रकरण सहावें.
_____०______
दिनचर्या, न्याहारी व अभ्यास.

 गेल्या प्रकरणांत स्नान, संध्या व नमस्कार यांचा विचार केला. या प्रकरणांत न्याहारी व सकाळचा अभ्यास यांचे विवेचन करूं, पहाटे उठून प्रातःस्मरण, शौचमुखमार्जन, स्नान, संध्या, नमस्कार, व्यायाम एवढा नित्यक्रम आटोपला ह्मणजे कांहीं वेळानें विद्यार्थ्यांनीं न्याहारी करावी. समर्थ ह्मणतात " कांहीं फळाहार ध्यावा । भग संसार धंदा करावा. ॥ " ह्मणजे सकाळीं सात आठ वाजण्याच्या दरम्यान कांहीं तरी खाऊन प्रत्येकाने आपआपल्या उद्योगास लागावें. विद्यार्थ्यांनीं सकाळीं थोडी न्याहारी करावी, व अभ्यासास बसावें. ब्राह्मणेतर समाजांत न्याहारीची फार चांगली चाल आहे. शेतकरी, कुणबी, माळी हे लोक सकाळीं काहीं खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडतच नाहींत. आरोग्यशास्त्रदृष्टया हैं सकाळचें खाणें पित्तशामक,


 5 टीप - लोणावळे येथें कुवलयानंदाश्रमांत आसनांचे सशास्त्र शिक्षण मिळते. औंध येथे निघणारे पुरुषार्थ मासिकहि आसनाबद्दल चांगली चर्चा करित असत.