पान:विद्यार्थि धर्म.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


एक मार्ग आहे. दोन हात, दोन पाय, दोन गुढघे, छाती आणि डोकून सूर्यनमस्कार घालावेत. नमस्कार घालतांना तोंडाने श्वासोच्छ्वास करूं नये. स्वच्छ व प्रसन्न जागेंत नमस्कार घालावेत. सोळा वर्षांवरच्या विद्यार्थ्यांनी १२५ ते २५० पर्यंत नमस्कार घालण्यास हकरत नाहीं. विशीच्या वरचें ज्यांचें वय आहे अशांनी २५० ते ५०० पर्यंत नमस्कार खुशाल घालावेत; त्यामुळे शरिरास फारच फायदा होईल. पूर्वीच्या बाराबारारों नमस्कार घालणाऱ्या लोकांच्या गोष्टी हल्ली फारशा ऐकूं येत नाहीत; परंतु पेशवाईत व पर्वपर्वा- पर्यंत कित्येक ब्राह्मणी संस्थानामध्येसुद्धां बाराबाराशें नमस्कार घालणारे लोक होते. " चढते वाढते दंड " काढण्याचा गोपिका- वाईने सवाई माधवरावास उपदेश केला आहे. समर्थांचे वडील सूर्याजीपंत हे कट्टे सूर्योपासक होते. पानपतच्या रणांगणावर जाऊन अहमदशहा अबदालीची रग जिरखूं इच्छिणारा भाऊसाहेब पेशवा सूर्योपासक होता. पूर्वी घरच्या घरी करतां येण्यासारखा, सुटसुटीत व बिनपैशाचा, आटोपशीर असा हा व्यायाम आणि उपासनामार्ग सर्वमान्य झाला होता. अलीकडे त्याचा -हास होऊं लागला आहे. विद्यार्थ्यांनीं स्नानसंध्या झाल्यावर स्वार्थ परमार्थ साधून देणारा सूर्य नमस्काराचा व्यायाम अवश्य करावा. * विद्यार्थ्यांनी तालमीत अगर आपल्या अभ्यासाच्या खोलींतच जोर, बैठका काढाव्या आणि जोडी करावी. योगशास्त्रांत सांगितलेली निरनिराळी आसने शरीर- बलाच्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहेत. शीर्षासन, मयूरासन, पद्मासन, बद्धपद्मासन, प्रेतासन, पश्चिमोत्तान, धनुष्यासन, मत्सेंद्र- बंध अशी दहापांच आसने विद्यार्थ्यांनी कोणताहि व्यायाम झाल्या- वर करावीत. अपचन, पोटफुगी, पानथरी, यकृत, मूळव्याध वगैरे


  • टीप -- सांगलीचे वैद्य परांजपे यांचे 'नमस्कार हें' पुस्तक पहा.