पान:विद्यार्थि धर्म.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


संध्या अगर ईशस्तुति.

 वर सांगितल्याप्रमाणे प्रातःस्नान झाल्यानं विद्यार्थ्यांनीं जग- नियंत्या परमेश्वराची उपासना करावी. त्रैवर्णिकांनी संध्या करावी आणि इतरांनीहि सूर्याची प्रार्थना हाणजे संध्या करावी. विद्यार्थ्यांना सूर्य व अग्नि यांचीच उपासना योग्य आहे. राष्ट्रांतील तरुण पिढी ओजस्वी, तेजस्वी व बाणेदार व्हावी हाणून ही उपासना सांगितली आहे. अग्नीची उपासना ही श्रौतस्मार्तकर्माचा लोप झाल्यामुळे बंद पडली असली, तरी सूर्योपासना विद्यार्थ्यांनी केलीच पाहिजे. मुसलमान व ख्रिश्चन पंथी लोक नमाज व प्रार्थना संध्येच्या वेळीं करितात. हिंदु विद्यार्थ्यांनींही आपल्या धर्माप्रमाणें न चुकतां सकाळ- संध्याकाळ ईशस्तवन करावें. हिंदु समाजांत सामुदायिक जिवंतपणा आण- ण्यास सूर्योपासना हें मोठेंच साधन होणार आहे. कोणाहि विद्यार्थ्यास कितीहि गडबड असली तरी अवध्या पांच मिनिटांत संध्या उरकतां येते. कारण, अर्घ्यप्रदान, गायत्रीजप, उपस्थान हीच संध्येचीं प्रधान अंगे आहेत. संध्या ह्मणजे संधीकालची सूर्योपासना. स्थावर जंगम जगताचा आत्मा जो सूर्यनारायण तो सर्व जगाचे दैवत आहे. ह्मणून कोणत्याही जातीच्या आणि पंथाच्या विद्यार्थ्यांनीं सूर्योपासना करण्यास बिलकुल हरकत नाहीं. सूर्यकिरणांमध्ये अनेक प्रकारचे दुष्ट जंतू नाहींसें करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे सूर्यतेजाने आरोग्य व बुद्धि वाढते असा सिद्धांत आहे. 'ज्या घरीं सूर्यकिरणांचा प्रवेश होत नाहीं तेथें डाक्तरचा प्रवेश होतो आणि ज्या घरांत प्रकाश भरपूर असतो तेथें डाक्तरला क्वचितच जावें लागतें, ' ही इंग्रजी हाण हि सूर्यतेजा महत्व दाखविते. संध्येमध्ये सूर्यनारायणाला तूं माझ्या बुद्धीचा प्रेरक हे, अशीच प्रार्थना करावयाची असते, बुद्धीचे तेज वाढावें, प्रतिभा- संपन्नता यावी अशी इच्छा असल्यास सर्व विद्यार्थ्यांनीं नित्य सूर्योपासना करून त्याच्या जवळ तेजाची प्रार्थना केली पाहिजे. ज्याच्या जवळ जो पदार्थ असतो त्याचीच याचना जगांत कोणीही