पान:विद्यार्थि धर्म.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें. ]
स्नान, संध्या व नमस्कार.

३९


वीत, जांभया देत, कोणीकडे तरी पाहात, उठत आहेत, आळस मी ह्मणतो आहे, उत्साहाच्या नांवानें आंवळ्यायेवढें आहे, असें विद्यार्थ्याचें ध्यान पाहिले ह्मणजे हिंदुस्थानच्या भावी उत्कर्षाबद्दल जबरदस्त शंका येऊ लागते. विद्यार्थ्यांना आपल्या आळसरूपी शत्रू जर निर्दालन करावयाचें असेल तर त्यांनीं प्रातःस्नान हैं मोठें शस्त्र उपयोगांत आणावें. विशेषतः सूर्योदयापूर्वी शीतोदकानें प्रातःस्नान हैं फारच गुणकारक आहे, असे हल्लीं डॉक्टर लोकही सांगू लागले आहेत. आधुनिक जगांत एक जंतुशास्त्र उत्पन्न झालेलें असून सूर्योदयानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर तळाशी असलेले जंतु येत असतात आणि ते अपकार करतात असें हें शास्त्र सांगते. अर्थात् सूर्योदयापूर्वी वाहत्या पाण्यांत स्नान केल्यास या जंतूंची बाधा बिलकूल होत नसून आयुष्यही वाढते.एक सूर्योदयापूर्वी उठून प्रातः स्नान करण्याचा नियम केला कीं,त्याबरोबर इतर पथ्यें येतात. रात्री लवकर निजावें लागतें, जाग्रणे टाळावी लागतात, पदार्थ चांगला असला तरी रात्रीं तो अधिक खाण्याचा मोह आवरावा लागतो, आणि सकाळी उठल्याबरोबर आळसाला हद्दपार करून प्रातःस्मरण करावें लागतें. उष्णोदक स्नानांतील परावलंबनाचा कंटाळा येऊन स्वावलंबन देणारें प्रातः स्नानच बरें वाटते. तात्पर्य, धर्मशास्त्रदृष्ट्या पुण्यवर्धक,वैद्यशास्त्रदृष्ट्या आयुष्य व बलवर्धक, जंतुशास्त्रदृष्टया रोगप्रतिबंधक, राष्ट्रीयदृष्ट्या स्वावलंबनोत्पादक आणि व्यवहारदृष्ट्या जालस्य- घातक, असें प्रातःस्नान असतां जो विद्यार्थी या कामधेनूचा स्वीकार करणार नाहीं तो करंटाच समजला पाहिजे. राष्ट्राच्या उत्कर्षास उद्योगशीलता, स्वावलंबन, आरोग्य, उत्साह, स्वच्छता, टापटीप, नियमितपणा, विनचूकपणा यांची अत्यंत आवश्यकता आहे. हे सर्व सद्गुण वाढण्यास प्रातः स्नान बऱ्याच अंशी कारणीभूत होणार आहे हैं वरील विवेचना वरून दिसून येईल.