पान:विद्यार्थि धर्म.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


अशा शास्त्रकारांच्या विद्यार्थ्यांना आज्ञा आहेत. या आज्ञांचें उल्लंघन विद्यार्थ्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्या पूर्वी करणें अत्यंत गैरशिस्त आहे.

 ३ प्रातःकाळी शीतोदक स्नान हैं स्वावलंबन उत्पन्न करतें असें वर हाटलें त्याचे कारण आणखी एक आहे. स्नानाबरोबर हातां- सरशी सहज धोतरे धुण्याचे काम करितां येतें. प्रत्येक विद्यार्थ्यांनें स्वतःचा कपडा स्वतः धुतला तर त्या कपड्याचें व तो वापरणाऱ्याचें आयुष्य वाढतें. हिंदुस्थानांतल्या लोकांची स्थिति " मिजास राजाची व नांदणूक कैकाड्याची" अशी झाली आहे. इकडे एका बाजूस दारिद्र्य वाढलें, पारतंत्र्य आलें, अर्से रडावयाचें, आणि दुसऱ्या बाजूस स्वतःचे नेसलेले धोतरही धुण्याचा, स्वतःची जागा झाड ण्याचा, स्वतःचे भांडे घांसण्याचा पर्वतायेवढा आळस !! या पशुतुल्य स्वभावास काय ह्मणावें हें सांगावयास नकोच. पुष्कळ लोकांच्या घरी ते श्रीमंत असोत वा गरीब असोत असे भिजलेले कपड्यांचे पिळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुजत पडलेले असतात! यामुळे कपडे लवकर फाटून खर्च जास्त येतो ही गोष्ट कांहीं कोणाच्या लक्ष्यांत येत नाहीं. असो. विद्यार्थ्यांनी स्वतः स्नानोत्तर आपली धोतरें स्वच्छ धुवावीं, तांब्या भांडे घांसून पिण्याकरितां चांगले पाणी गाळून घेऊन जावें. अशा नित्याचरणाने विद्यार्थ्यांना स्वच्छता, नियमितपणा यांची संवय लागून घाणेरडेपणा, अमंगळ- पणा, गलिच्छपणा यांचा तिटकारा येईल. स्नान करून शुचिर्भूत होणाऱ्या विद्यार्थ्याला तोंड न धुतलेल्या माणसाशीं बोलावयाची संती वाटेल. त्याला केर न काढलेल्या जागीं वसवणार नाहीं. आणि तो दररोज स्नानास जाण्याच्या पूर्वी आपली जागा झाडूनच जाईल. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी दररोज खोलीच्या केराबरोबर आपला आळसही झाडून टाकील. रात्रीं जागरणें करून आठ वाजेपर्यंत आपले पडले आहेत, आठनऊ वाजतां बुरशा तोंडाने आंग व डोकें दोन्ही हातांनी खरखर खाज-