पान:विद्यार्थि धर्म.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


आहे. : दररोज शीतोदकानें स्नान करणाऱ्या मनुष्याचें शरीर सतेज दिसतें. सतेज मनुष्य कुरूप असला तरी सुरूप दिसतो. प्रातः स्नानानें आरोग्य चांगले खणखणीत होत असल्या- मुळें त्या माणसाजवळ बसण्यास किंवा त्याचा सहवास करण्यास कोणासहि अमंगलतेची अडचण वाटत नाहीं. एकाद्या माणसास चांगली झोप येत नसल्यास त्यानें नित्य सकाळ संध्याकाळ शीतोदकानें स्नान करावे ह्मणजे झोंप फार उत्तम येईल आणि स्वप्नेही पडणार नाहीत. याशिवाय विद्यार्थ्यांनीं लक्ष्यांत ठेवण्यासारखे प्रातः स्नानाचे आणखी दोन फायदे आहेत. ते स्वरशुद्धि ह्मणजे चांगला अवाज होणें आणि वर्णशुद्धि ह्मणजे स्पष्ट वर्णोच्चार होणे हे होत. महाराष्ट्रीय ब्राह्मणांची वाणी अत्यंत शुद्ध आणि संस्कारयुक्त असते. याचे कारण महाराष्ट्रीय ब्राह्मण दररोज स्नान करितात आणि उत्तरेकडचे करीत नाहींत हें असावें कीं काय, असा संशय येतो. खणखणीत वाणी आणि स्पष्ट वर्णोच्चार हीं वक्तृत्वाचीं साधनें आहेत. ज्यांना चांगले वक्तृत्व संपादावयाचें आहे त्यांनी प्रातः स्नानापासून होणारा वरील फायदा अवश्य लक्ष्यांत ठेवावा.

 २ शरीरस्नानाबरोबर विद्यार्थ्यांनीं नेत्रस्नानहि करावें. मात्र या स्नानाला गोडे पाणी पाहिजे. वाहत्या पाण्यांत व विहिरींत बुचकळी मारून स्नान करावयाचें असल्यास पाण्यांत डोके बुडवून डोळ्यांची उघड झांक करावी ह्मणजे झालें. ही सोय नसेल तर बालडी, गंगाळ अगर रुंद तोंडाचे पातेलें घेऊन त्यांत पाणी कांठोकांठ भरून ठेवून आंत तोंड बुडवून डोळ्यांची उघडझांक करावी. यासच नेत्रस्नान हाणतात. यामुळे सर्व नेत्ररोग व मस्तकशूळासारखे इतरहि रोग नाहींसे होतात. हें नेत्रस्नान मुख्य स्नानाच्या पूर्वी किंवा नंतरही आंग कोरडे केल्यावर करावे. ज्या विद्यार्थ्यांना अकाली चाळशी लावावी लागते, ज्यांच्या दृष्टींत थोडा दोष आहे, ज्यांच्या डोळ्यांना नुकतीच मंदता येऊ लागली आहे, त्यांनी दिवसांतून तीन वेळां नेत्रस्नान करावें. डोळ्यांचे सामर्थ्य वाढावें, दृष्टी सतेज असावी, असें ज्यांना वाटत