पान:विद्यार्थि धर्म.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें. ]
स्नान, संध्या व नमस्कार.

३५


ओढा असल्यास तेथे जाऊन स्नान करावे. विशेषतः पोहण्याची सोय असल्यास तेथे जाऊन स्नान करावें व पोहावें. नदी किंवा चांगली पोहण्यासारखी विहीर असल्यास विद्यार्थ्यांनीं सकाळीं तेथें जाऊन स्नान व त्याबरोबरच अर्धा पाव तास पोहणें, धोत्रे धुणे, केल्यास फारच उत्तम. निदान घरीच विहिरींतून ताजे पाणी स्वतः काढून किंवा शहरची वस्ती असल्यास नळाजवळ अगर हौदावर जाऊन विद्यार्थ्यांनीं शतिदिकस्नान करावें. शीतोदकाच्या स्नानाने किती फायदे होतात याची कल्पना यावी ह्मणून दक्षस्मृति व महाभारत यांतील दोन श्लोक खालीं देतों.

गुणादश स्नानपरस्य साधो रूपंच तेजश्च बलंच शौचम् ।
आयुष्यमारोग्यमलोलुपत्वं दुःस्वप्रघातश्च तपश्चमेधाः ॥

दक्षस्मृति.

गुणादश स्नानशीलं भजते बलं रूपं स्वरवर्णप्रशुद्धिः ।
स्पर्शश्च गंधव विशुद्धता च श्रीः सौकुमार्य प्रवराश्च नार्यः।।

उद्योगपर्व महाभारत.

 अर्थ:-- १- रूप, तेज, बल, पावित्र्य, आयुष्य, आरोग्य, इंद्रिय- निग्रह, स्वप्ने न पडणें, तप व बुद्धिमत्ता असे प्रातः स्नानाचे दहा गुण आहेत. बल, रूप, स्वरशुद्धि, वर्णशुद्धि अंगाला घाण न येणे, पावित्र्य, आकर्षकता, लक्ष्मी, सौंदर्य वगैरे दहा गुण प्रातः स्नानशील मनुष्याच्या अंगीं येतात.

 प्रातः स्नानापासून पहिला फायदा ह्मणजे स्वावलंबन हा होय. आपल्या परावलंबी राष्ट्राला स्वावलंबी करावयाचें असल्यास राष्ट्रांतील तरुण पिढीने विशेषतः विद्यार्थ्यांनीं स्वावलंबी बनले पाहिजे. ऊन पाण्यानें स्नान करण्यांत सगळा परावलंबीपणा आहे. व थंडपाण्यानें स्नान करण्यामध्ये सर्वस्वी स्वावलंबनच आहे. तसेच प्रातःस्नान हें बुद्धिवर्धक आणि आयुष्यवर्धकही