पान:विद्यार्थि धर्म.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
विद्यार्थी - धर्म.

[ प्रकरण


दररोज प्रातःकाळींच ह्मणजे सूर्योदयापूर्वीच किंवा निदान सूर्योदया- नंतर एका तासाचे आंत तरी स्नान करावें. एकदम शीतोदकानें प्रातःस्नान सोसणार नाहीं; हाणून नेहमी उन्हाळ्यामध्ये प्रातः स्नान प्रारंभ करावा. सवय नसतांना प्रातः स्नान करूं लागल्यास पहि- ल्यानें एक दोन वेळां थोडें पडसें येतें, किंवा आंग मोडून येतें. परंतु अशा वेळी दोन चार दिवस अजीवात स्नान करूं नये व पुनः थंड पाण्याने स्नान करावें. कधीं ऊन कधीं थंड अशा तन्हा केल्या कीं त्या अपाय करितात. प्रकृति जरा चांगली असली व मनोनिग्रह असला की थंड पाण्याचें प्रातःस्नान पाहिजे त्या ऋतूंत सोसते. स्नान हैं नेहमी शांतोदकानेच करणे चांगले. फक्त दुर्बल विद्यार्थ्यांनी उष्णोदकानें स्नान करावें. उष्णोदक स्नान हें केशव चक्षू यांचें चल हरण करणारें आहे, असें वैद्यशास्त्र सांगतें.

उष्णांबुनाऽधः कायस्य परिपेको बलावहः ।
तेनैव चोत्तमांगस्य बलहृत्केशचक्षुषाम् ॥

( वाग्भट ).

अकाल केश गळणें, पांढरे होणें आणि डोळ्यांचे तेज कमी होणे असे जे प्रकार अल्प वयांतच आढळतात, त्याचें कारण कसली तरी स्पिरिट घातलेलीं कृत्रिम तेर्ले डोक्यास चोळून कढत कढत पाणी डोक्यावर ओतून घेणें हेंच असले पाहिजे. दर आठ किंवा पंधरा दिवसांनीं श्रमपरिहारार्थं तिळांचें, खोबऱ्याचें, अगर आवळ्याचे शुद्ध तेल सर्वांगास चोळून उष्णोदकाने अभ्यंग स्नान केल्यास तें सुखद व बलप्रद असें होतें. पण नित्य उष्णोदकस्नान हैं अपायकारकच आहे. ह्मणून विद्यार्थ्यांनी आरोग्यशास्त्र, धर्मशास्त्र व स्वावलंबन या सर्व शीतोदकाने प्रातः स्नानच केले पाहिजे. प्रातः स्नानास वाहते पाणी अर्थात् नदी ही फारच उत्तम होय. प्रत्येक गांवास नदीची सोय असणें अशक्यच हाणून विहीर, तळें, चांगला