पान:विद्यार्थि धर्म.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें. ]
स्नान,संध्या व नमस्कार.

३३


प्रकरण पांचवें.
__________
स्नान, संध्या व नमस्कार.

 चौथ्या प्रकरणांत नित्यक्रमांतील प्रातरुत्थान, प्रातः स्मरण, ' पाठां- तर, शौच, मुखमार्जन, इतक्या गोष्टींचा विचार केला. या प्रकरणांत स्नान, स्नानांतर्गत कांहीं गोष्टी, संध्या व सूर्यनमस्कार यांचा विचार करूं.

 स्नानः — स्नानासारखें शरीरशुद्धीचे मोठे साधन दुसरें कोण- तेहि नाहीं, अति थंड देशांत दररोज स्नानाची आवश्यकता नसते. हिमालयाच्या आसपासचे मुलुख, काश्मीरदेश, आणि इंग्लंड अशा ठिकाणी थंडी कडक असल्यामुळे दररोज स्नान केल्यास उपायापेक्षां अपायच होण्याचा संभव आहे. गोदावरी, तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांमधील टापू हवेच्या दृष्टीनें समशीतोष्ण असा आहे, अर्थात् या भागांतील विद्याथ्यांनी दररोज स्नान अवश्यच केलें पाहिजे. सामान्यतः ब्राह्मणांमध्ये आणि मराठा क्षत्रियांमध्ये दररोज स्नान करण्याची पद्धत आहे. हीच पद्धत सर्व विद्यार्थ्यांनी अवलंबिली पाहिजे. समर्थांच्या आनंदवनभुवनामध्ये कडक थंडी आणि कडक ऊन फार क्वचितच असते. कोणत्याहि काळी कोणत्याहि ऋतूंत महाराष्ट्रांतील विद्यार्थ्यांना स्नान करण्यास आजार किंवा पाण्याचा दुष्काळ यांशिवाय कोणतीच अडचण नाहीं. धर्मशास्त्रदृष्ट्या नव- छिद्रसमन्वित शरीराची दुर्गंधी नाहींसें करणारें, अमेध्य पदार्थजन्य अपवित्रता नाहीसे करणारें, दृष्टादृष्ट फलक असें स्नान आहे. प्रातःस्नान हें उत्साह वाढविणारें व रोग नाहीसे करणारे एक दिव्यौषधच आहे. धर्मशास्त्रकारांनी स्नानाकरितां एक संकल्पही सांगितला आहे. त्यामध्यें जलाधिष्टित देवता वरुण, आणि गंगा यमुना यांच्यासारख्या पवित्र नद्यांची स्तुति केली आहे. विद्यार्थ्यांनी