पान:विद्यार्थि धर्म.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथें.]
नित्यक्रमांतील कांहीं गोष्टी.

३१


शौचशुद्धिनंतर डाव्या हातानें शौचपात्र कधींही आणूं नये. अगदीं स्वतंत्रच शौचपात्र असेल तरीसुद्धां तें डाव्या हाताने आणूं नये. नित्य व्यवहारांतील तपेली अगर तांब्या शौचास नेऊन तो डाव्या हाताने आणणे हा मनस्वी अमंगळपणा आहे, मलद्वाराची चांगली शुद्धि करून डावा हात चांगला धुवून नंतर मुखमार्जन करावें. डावा हात माती लावून चांगला धुवीपर्यंत त्या हाताने कोणताहि व्यवहार करूं नये.

 मुखमार्जनांतील मुख्य भाग ह्मणजे दंतधावन हा होय. पण मौज अशी आहे कीं, तुरुंगावरील अधिकारी जितकी कैद्यांच्या दातांची काळजी घेतो तितकीहि काळजी हिंदुस्थानांतील विद्यार्थी आपल्या दांतांची घेत नाहींत, ही अत्यंत शोचनीय गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचे दांत जितके बळकट असतील तितकें त्यांचे आयुष्य वाढेल. धर्मशास्त्रांत दांत अमक्या अमक्या काष्टानें घासावे असें सांगितलें आहे. दंतधावनाच्या बाबतीत आह्माला महाराष्ट्रीयांपेक्षां गुर्जरबंधूंची चाल जास्त पसंत पडते. गुर्जरबंधू नेहमी दांतवण (दांतवन) ह्मणजे बाभ- ळीच्या काड्या वापरतात. बाभळीच्या किंवा लिंबाच्या काटक्यांची टोंकें थोडीं चावल्यानंतर तो कुंचला दांत स्वच्छ करण्यास फारच उपयुक्त होतो. शिवाय बाभळीच्या तुरटपणामुळे दांत बळकट होतात, आणि लिंबाच्या तीक्ष्णपणामुळे दांतांतील कीड नाहींशी होते. परदेशी टूथपावडर आणि तिच्याकरितां दररोजचा उष्टा ब्रश ( कुंचला ) यापेक्षां नित्य नवा बाभळीच्या काटकीचा ताजा कुंचला, स्वदेशी, स्वस्ताई आणि आरोग्य या दृष्टीने हितकर नव्हे काय ? कॉलेजमध्यें विद्यार्थी गेला की, त्याला टूथपावडर व ब्रश यांचे वेडच लागते. परंतु हिरड्यांमध्ये किंवा दांतांमध्ये टूथपावडर एकदां जाऊन बसली ह्मणजे ब्रशानेही ती सर्व साफ होत नाहीं. त्यापेक्षां आपली राखुंडी ( शेणकुडाचा कोळसा ) ही फारच चांगली. राखुंडीनें दांत चरचरीत स्वच्छ घांसले जातात. आणि ती रक्षा असल्यामुळे जरी हिरड्यांच्या आणि दांतांच्या