पान:विद्यार्थि धर्म.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौथें.]
नित्यक्रमांतील कांही गोष्टी.

२९


व प्रसंगावधान या दोन गुणांचे वर्धन होते प्रभातकाली सुविचार डोक्यांत येतात ते दृढ होण्यासाठी सुविचारांचेच वाङ्मय चांगले पाठ केले पाहिजे. सुविचासनी भरलेलें, काव्यरसाने ओथंबलेले व स्फूर्तिगंधानें दरवळलेले वाङ्मय पाठ केल्याने मन प्रसन्न रहातें व अंतःकरणावर चांगला ठसा उमटतो. बुद्धीचे मालिन्य, तामसवृत्ति व जाड्य नाहींशी करण्याला या पाठां- तराचा चांगला उपयोग होतो. पूर्वीचें शिक्षण केवळ स्मरणशक्तीच्या एका टोंकाला झुकलें होतें, त्याच्या उलट हल्लींची स्थिति आहे. हल्ली सम-जशक्तिव विचारशक्ति वाढलेली दिसेल. पण सर्व विद्या पुस्तकस्था हाणजे पुस्तकावर निळ्या तांबड्या पेन्सिलीच्या रेघांमध्ये लपलेली दिसेल !!! गीतेचे दहा पांच श्लोक ओळीने चांगल्या विद्वानालाही पाठ ह्मणतां येण्याची मारामार पडते. विचारशक्ति बरोबर स्मरणशक्तीची वाढ होण्याला रामपायामध्ये खूप पाठ केले पाहिजे. " मागील उजळणी पुढे पाठ । नेमचि धरावा निकट । बाष्कळपणाची वटवट | करूंचि नये ॥ ह्मणजे पहाटे उठून दुसऱ्या विद्यार्थ्यांशी गप्पा न मारतां आधी मागची उजळणी करून नंतर पुढील पाठ करावें असा श्रीसमर्थाचा उपदेश आहे. लहानपणापासून पाठ करीत गेले तर दररोज थोडेथोडे मिळून त्याचा बराच संग्रह होतो. या संग्र- हाचा उपयोग आगगाडीमध्यें, आगबोटीमध्ये, तुरुंगांतील एकांतवा - सांत सर्वांपेक्षां जास्त होतो, असें कांहीं लोक अनुभवाने सांगतात. पुस्तकाची किंवा दुसऱ्या कोणाची अपेक्षां न ठेवितां ज्याचा त्याला ज्ञानानंद अनुभवितां येतो. आगगाडींत व पायी प्रवास करितांना पाठ केलेला विषय घोळवीत घोळवीत उच्चारल्याने तो चांगला बसतो व मनाला एक प्रकारचा सात्विक आनंद होतो. न्या. मू. रानडे यांना उत्तरवयांत तुकोबारायाचे अभंग घोळवून घोळवून ह्मणण्याचा भारी नाद लागला होता असे झणतात. सर सुरेंद्रनाथ बनर्जी यांची पाठशक्ति जबर होती. इंग्रजी व बंगाली काव्यांचे सर्गच्या सर्ग ते तोंडपाठ ह्मणत. वक्ताला पुष्कळ