पान:विद्यार्थि धर्म.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
विद्यार्थि–धर्म.

[ प्रकरण


माणसाजवळसुद्धां हीं साधनें असली कीं, अन्याय व जुलूम यांचा गवगवा आणि त्यांच्या प्रतिकारार्थ योग्य तो चळवळ चांगली करितां येते.

प्रकरण चौथें.
__________
नित्यक्रमांतील कांही गोष्टी.

 तिसऱ्या प्रकरणांत विद्यार्थ्यांनीं आपल्या ध्येयानुसार कोणकोणती साधनें अत्यंत आवश्यक ह्मणून मिळविली पाहिजेत, याचे सामान्य दिग्दर्शन केलें. कोणतेंहि साधन मिळवावयाला कांहीं काल सतत परिश्रम करावे लागतात. गेल्या प्रकरणांत सांगितलेलीं साधनें हीं विद्यार्थिदशेत, नित्य परिश्रमाने साध्य होणारी आहेत. क्षणाक्षणानें विद्या मिळवावी व कणाकणानें अर्थ ह्मणजे द्रव्य संपादन करावें, अशी जी ह्मण आहे ती विद्यार्थिदशेतील साधनें हस्तगत करण्याच्या चाबतींत अक्षरशः खरी आहे. विद्यार्थ्यांनीं आपल्या नित्यक्रमांत शरीर, मन, वाणी आणि बुद्धि यांजवर योग्य संस्कार होतील व ध्येयानुकूल सामर्थ्य त्यांच्या ठिकाणीं येईल अशी व्यवस्था केली पाहिजे, शरीरबल, बुद्धिबल, मनोबल, तपोवल व शील हीं एका दिवसांतच अगदी अचानक कधींहि हातीं येत नाहींत. विद्या- र्थ्यांचा नित्यक्रमच असा असावा की, ज्या गोष्टी त्यांना संपादन करावयाच्या आहेत, त्या त्यांना नित्यक्रमाच्या योगानें दररोज "थोड्या थोड्या मिळू लागतील. दररोज जसा थोडा थोडा अभ्यास करून एकादें पुस्तक आपलेसे करावयाचें असतें, त्याचप्रमाणें सर्व गोष्टींचा अभ्यास दररोज थोडाथोडा केला ह्मणजे काम होईल. विद्यार्थ्यांच्या नित्य व्यवहारांत सकाळपासून रात्रीं निजे - पर्यंत ज्या ज्या गोष्टी होतात, त्या सर्व गोष्टींची ध्येय - साधनाला एक