पान:विद्यार्थि धर्म.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें. ]
साधन - विचार.

२५


दिलें जातें. णून विद्यार्थ्यांनीच आपला इतर अभ्यास संभाळून आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञान स्वतःच्या वाचनानें संपा- दिलें पाहिजे, आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञान विद्या- र्थ्यांना नसले तर त्यांच्या फाजील अभिमानाच्या किंवा अभिमान- शून्यतेच्या भलभलत्या कल्पना बनतात आणि त्यामुळे त्यांचें व त्यांच्याद्वारे होणाऱ्या कार्याचे नुकसान होतें.

 (इ) स्वभाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. हल्लीच्या शिक्षणांत स्वभाषेला अर्धचंद्र मिळालेला आहे. स्वभाषेशिवाय कोणतेही विचार, विकार, भावना आणि कल्पना चांगल्या प्रकारें व्यक्त होत नाहींत आणि आपले हृदय दुसऱ्यांच्या हृदयामध्यें मिस- ळतां येत नाहीं. सर्व शिक्षण इंग्रजी भाषेतून होत असल्यामुळे स्वभाषेची अत्यंत हेळसांड होते, हें अनुभवसिद्ध आहे. याकरितां विद्यार्थ्यांनी आपल्या भावी कार्याचे साधन ह्मणून स्वभाषा उत्तम बोलतां येईल व लिहितां येईल अशी कमाविली पाहिजे. स्वभाषेशिवाय विचारांत जिवंतपणा येत नाहीं. यास्तव स्वभाषेचा अभ्यास विद्यार्थिदशेत अत्यंत आस्थेने करावा.

 (ई) नित्य व्यवहारांत स्वतःला व लोकांना उपयोगी पडण्या- पुरतें टाणाकुणा तरी आर्यवैद्यकाचें ज्ञान प्रत्येकाला पाहिजे. व्यवहारोपयोगी ह्मणून जसें गणित, अक्षर, हिशेब ठिशेव हे थोडे बहुत पाहिजेत, तसेंच अगदी सामान्य मनुष्यालासुद्धां थोडें बहुत आर्यवैद्यक, सुतारकाम, गवंडीकाम, शिवणकाम यांचें ज्ञान पाहिजे. या अल्प ज्ञानाच्या अभावीं व्यवहार नडतो व पैसाहि फार जातो.

 ( 3 ) वक्तृत्व व लेखनकला हीं हल्लींच्या कोणत्याहि चळव ळीचीं साधनें आहेत. आपले विचार स्पष्ट व शुद्ध भाषेत लिहिणे आणि सांगणे यांची जरूरी प्रत्येकाला आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अल्पस्वल्प कारणामुळे लोकांत करण्याचा प्रसंग हल्लीं वरचेवर येत असतो. ह्मणून अगदी सामान्य