पान:विद्यार्थि धर्म.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


पूर्वीच सांगितलें आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व इतर अनु- कुलता जशी असेल त्याप्रमाणें तो विद्याक्षेत्र शोधील किंवा कार्य- क्षेत्र पाहील. परंतु हिंदुस्थानांतील प्रत्येक विद्यार्थ्याला मनुष्य ह्मणून कांहीं कांहीं विषयांचे ज्ञान अवश्य पाहिजे आहे. हें ज्ञान शाळांत मिळत नाहीं, घरांत मिळत नाहीं ह्मणून विद्यार्थ्यांनी तें स्वकष्टानेंच संपादन केले पाहिजे. बौद्धिक ज्ञानाचे अत्यंत आवश्यक व सर्वो- पयुक्त असे विषय आमच्या मतें खालील प्रमाणें आहेत.

 ( अ ) प्रत्येक विद्यार्थ्यानें विद्यार्थिदशेतच आपल्या धर्माचें आणि संस्कृतीचे ज्ञान चांगले करून घेतले पाहिजे. हल्लीं गृह- शिक्षण नाहीसे झाले आहे आणि धर्मशिक्षण हा शाळांमध्यें विषयच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या धर्माचें व संस्कृतीचें बिल- कुल ज्ञान मिळेनासे झाले आहे. ही स्थिति सर्वथैव शोचनीय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या धर्माची आणि संस्कृतीची योग्य कल्पना नसेल तर त्याच्या ठिकाणी योग्य स्वाभिमानहि उत्पन्न होणार नाहीं. हिंदुस्थानच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेले स्वधर्म संस्कृतीचे भांडवल मुख्य आहे. त्याबद्दल " जुनें ठेवणें मीपणें तें कळेना " अशी त्यांची स्थिति असू नये. मात्र हें ज्ञान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नावर मिळविले पाहिजे. तज्ज्ञांची व्याख्यानें आणि तशा माण- सांचा सहवास या योगानेंच त्यांना हें ज्ञान प्राप्त होईल. देशांतील जागृतीमुळे हल्लीं पूर्ववत् या विषयाला अपरिचित राहण्याची स्थिति राहिलेली नाहीं. तरी थोडा अभ्यास हा केलाच पाहिजे.


 ( आ ) स्वधर्म व संस्कृतीच्या ज्ञानावरोवर स्वराष्ट्रेतिहासाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवश्य पाहिजे. आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचे ज्ञान हाणजे आपल्या वाडवडिलांनी केलेल्या अनेक उलाढालीचे आणि झटापटीचे ज्ञान होय. हिंदुस्थानचा इतिहास हा संशोधन- सामुग्रीने हळूहळू बनत आहे; आणि त्यांतून पुष्कळ नवीन नवीन तत्वें बाहेर येत आहेत. प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या इति- हासाचे चांगले शिक्षण मिळत नाहीं. किंबहुना तें विकृत स्वरूपांत