पान:विद्यार्थि धर्म.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें. ]
साधन - विचार.

२३


प्रसंगीं दहा वीस मैल एका मजलीत चालून जाणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सवयीनेंच होत असतात. पाडव्या दसन्यास पैसा- फंड गोळा करणें, यात्राजत्रांच्या वेळीं स्वयंसेवक होणे, गांवांतील उत्सवसमारंभ यशस्वी करण्याकरितां झटून काम करणें, तात्पर्य जें समाजाचें सामाजिक हिताचे कार्य उत्पन्न होईल तें तें करण्याची विद्यार्थ्यांना लहानपणापासून सवयच पाहिजे. मोदक, शेवया, मांडे, असली पक्वान्ने बनविण्याची नुसती कृति माहीत असून जसें उपयोगी नाहीं; तर तीं तीं पक्वान्ने बऱ्याच वेळां केलीं गेलीं पाहिजेत. तशीच गोष्ट सर्व कामांची आहे. कोणत्याहि कामांत सफाईदारपणा येण्यास तीं तीं कामें बऱ्याच वेळां हातांतून गेलीं पाहिजेत. लहानपणींच उत्साह असतो हाणून अशा कामाच्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, गुडघाभर केरांत बसणारे पण केर न काढणारे, वाटेल तितकी घाण सहन करणारे पण शौचकूप न झाडणारे, परटाच्या हलगर्जीपणामुळे उवा झालेले कपडेहि वापरणारे पण ते स्वतः न धुणारे हरीचे लाल सुदैवाने वा दुर्दैवानें हिंदुस्थानच्या लोकसंख्येत पुष्कळच आढळतील, याचें कारण प्रत्येकास तसे करणें व राहणे आवडतें असें नसून चांगले करण्याची सवय नाहीं हेंच होय. भगवद्भक्तांच्या लक्षणामध्ये त्यांच्या इंद्रियांना ईश्वरभक्तीचेंच वळण लागलें असतें असें झटले आहे. तुकोबारायांची " पडलें वळण इंद्रियां सकळां " ही उक्ति यथार्थ आहे. भक्तीचें जसें इंद्रियांना वळण पाहिजे, तसेंच अनेक प्रकारचीं कामें उच्चनीचपणा मनांत न आणतां करण्याची इंद्रियांना सवयच पाहिजे. तात्पर्य विद्यार्थ्यांनीं लहानपणीं चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा.

 वेदांतामध्ये अधिकाऱ्याला साधनचतुष्टय सांगितले आहे. आह्मी विद्यार्थ्यांना त्यांनी उपरिनिर्दिष्ट साधनचतुष्टयसंपन्न व्हावें असें सांगतो. सामान्यतः कोणतेही साध्य हस्तगत करण्यास हैं साधनचतुष्टय अवश्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय निराळें असल्यामुळे त्याचा विचार साकल्याने होणें शक्य नाहीं, हें आहीं