पान:विद्यार्थि धर्म.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


राष्ट्राची " विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः " अशी स्थिति झाली आहे. प्रत्येकानें आपले व आपल्या समाजाचे जरा शोधक बुद्धीनें निरीक्षण केल्यास परस्पर प्रेम, परस्पर विश्वास, परस्पर नि- र्मात्सर्य, सहकार्य, सोशिकपणा, वगैरे सद्गुण आपल्या अंगांत किती आहेत याची चांगली कल्पना येईल. जोवर शीलाचा अभाव, सद्गुणांचा अभाव आपल्या ठिकाणी आहे तोवर चांगले दिवस येण्याची आशाच नको. विद्यार्थ्यांच्या अंतःकरणावर शिक्षणाचा चांगला संस्कार झाला ह्मणजे मग आपल्या समाजाच्या गुणावगुणांचे त्यांना यथार्थ ज्ञान होईल. हैं लक्ष्यांत घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य वेळींच सद्गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करावा व शीलसंपन्न व्हावें.

 ( ४ ) या साधनत्रयी खेरीज विद्यार्थ्यांनीं चौथें साधन हाणजे चांगल्या सवयी हैं प्राप्त करून घेतलें पाहिजे. हें चौथें साधन मागच्या साधनांचे पोषक आहे. इंग्रजीत " Habit is second nature अशी एक ह्मण आहे. ह्मणजे सवय हा एक दुसरा स्वभाव आहे. सवयीनें कोणतीहि गोष्ट आत्मसात् करितां येते. सवय किंवा अभ्यास यानें वाटेल ती असाध्य गोष्ट साध्य करितां येते. इंग्रजी राज्याच्या प्रारंभापासून एका विशिष्ट तऱ्हेच्या शिक्षण- यंत्रामुळे सुशिक्षित लोकांना पुष्कळ वाईट सवयी जडलेल्या आहेत. लष्करी शिस्त, बिनचुकपणा, वेळच्यावेळीं काम करणें, आठ आठ दहा दहा तास सारखे काम करित रहाणें, कर्तव्यदक्षतेने वागणें अशा गोष्टींची त्यांना सवयच नाहीं. अलीकडे ठिकठिकाणच्या राष्ट्रीय शाळांमधून अशा सवयी लागतील अशी दक्षता चालक घेत असतात; परंतु पुष्कळ दिवस आयदी, गावाळ, अव्यवस्थित आणि बेशिस्तपणामध्ये वागण्याची सवय झालेल्या आईबापांच्या मुलांना तें शिक्षण तापदायक व दुःसह होईल अशी आमची खात्री आहे. कोणतेही काम मनापासून करण्याची लहानपणापासून सवय पाहिजे. आजाऱ्यांची शुश्रूषा करणें, बाजारहाट करणें, स्वयंपाक करणे, पोहणें, धांवणें, झाडावर चढणें, उन्हातानांत सात आठ तास काम करणें,