पान:विद्यार्थि धर्म.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें. ]
साधन - विचार.

२१


करुन शीलसंवर्धन अवश्य केलें पाहिजे. श्रीसमर्थ सांगतात 'नकटें नाक, काळा वर्ण हे सहज गुण आहेत ह्मणून कांहीं उपाय चालणार नाहीं; परंतु दुसरे जे कांहीं येण्यासारखे गुण असतील ते अवश्य प्राप्त करून घेतले पाहिजेत. "रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहज गुणास नचले उपाये ॥ कांहीं तरी धरावी सोय । आगंतुक गुणाची ।।" जे सद्गुण आगन्तु ह्मणजे येण्यासारखे असतील ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा; अशी श्रीसमर्थांची शिकवणूक आहे. लहानपणीं तर वाईट गुण है संगतीने जडतात. आईबापांच्या दुर्लक्ष्यामुळे विद्यार्थी लहानपणीं दुःसंगतीत गेले तर त्यांच्या जन्माचें अकल्याण होते, असा अनुभव आहे. महाभारतांत "सर्वं शीलवता जितम् " असें जेंटले आहे तें यथार्थ आहे. खरोखरच शीलाच्या योगानें काय बरें मिळवितां येणार नाहीं ? काय पाहिजे तें मिळवितां येईल. आज हिंदुस्थानांत ज्याची एकसारखी घोषणा चालली आहे, तें स्वराज्य सुद्धां शीलाने मिळवितां येईल. महाभारतांतल्या शांतिपर्वात शीला- ख्यान या नांवाचें एक मजेदार व मार्मिक कथानक आहे. तें प्रत्येकाने मुळावरून वाचावें. निदान चिपळूणकरांच्या भाषांतरावरून तरी वाचावे अशी आमची शिफारस आहे. तथापि जातां जातां त्याचें तात्पर्य अगदी थोडक्यांत सांगावयाचे तर पुढीलप्रमाणे आहे. शीलसंपन्न प्रल्हादाने इंद्राचे राज्य घेतल्यामुळे त्याला फार वाईट वाटलें. शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून इंद्र आपल्या शत्रूकडे गेला आणि त्याने बटुवेष धारण करून उत्कृष्ट सेवा करून त्याची प्रसन्नता संपादिली, प्रसन्न झालेल्या प्रल्हादाने वर माग हाणतांच इंद्रानें शील मागितले, प्रल्हादाने त्याला शील दिल्यावरोवर त्याच्या शरीरांतून धर्म, सत्य, सदाचार, बलं असे चार सद्गुण एका मागून एक त्या इंद्रशरीरांत प्रविष्ट झाले आणि शेवटीं राज्यलक्ष्मीरूपी देवीनेंही इंद्राच्या गळ्यांत माळ घातली, गेलेलें राज्य परत मिळवू इच्छि- णारांनी या कथानकाचें चांगलें मनन करावें. फार काय पण हृदयावर कोरून ठेवावें. पारतंत्र्यपंकांत पडलेल्यां आपल्या