पान:विद्यार्थि धर्म.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


 या आर्येत सांगितलेले तत्व विद्यार्थ्यांनी लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे. अभ्यास याचा अर्थही हाच आहे की कोणतीही गोष्ट पुनः पुनः करणे. शरीराला जसा मजबूतपणा यावा हाणून व्यायाम करावयाचा असतो, तसेंच बुद्धीचे सामर्थ्य वाढावे ह्मणून अभ्यास ऊर्फ बौद्धिक व्यायाम करावयाचा असतो. बुद्धिबल श्रेष्ठ कीं शरीरवल श्रेष्ठ याची विचिकित्सा करण्याचें कारणच नाहीं. ह्रीं दोन्हीं बळे मानवी जीविताला अत्यंत आवश्यक आहेत. हा त्रिकालाबाधित सिद्धान्त आहे. ह्रीं दोन्हीं प्राप्त करून घेण्याच्या उद्योगास विद्यार्थ्यांनी लागावें हा उत्तम मार्ग आहे. शरीर आहे हाणून बुद्धि आहे आणि बुद्धि आहे ह्मणून शरीर आहे. याकरितां विद्यार्थिदशा हीच खरी बौद्धिक सामर्थ्य वाढविण्याची योग्य संधि असें जाणून आयुष्यनाश किंवा आत्मघात ज्या योगानें होईल त्या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करून बुद्धिबल अवश्य संपादन करावें.

 (३) शीलसंवर्धन हैं एक विद्यार्थिदशेतील प्रमुख साधन आहे. शील ह्मणजे सद्गुणसमूह होय. मनुष्याच्या सद्गुण दुर्गुणांचा विकास पूर्णपणे पुढेच होतो. असे जरी आहे तथापि सद्गुण दुर्गुणांचीं बीजें लहानपणीच अंतःकरणांत रुजलेलीं असतात. मनुष्य कांहीं एकदम प्रामाणिक किंवा अप्रामाणिक कधीही होत नाहीं. ते ते संस्कार लहानपणापासूनच उद्भूत किंवा अनुद्भूत स्वरूपांत वास करीत असतात. लोकमान्य टिळकांचा हट्टी स्वभाव हा लहानपणा- पासून हाणजे शाळेंत संत हा शब्द जेव्हां त्यांनी लिहिला तेव्हांपासून विकासूं लागला. रामशास्त्र्यांचा निस्पृहपणा, मंडलीकांचा वक्तशीरपणा, शहाजीचा मानीपणा, हे सर्व गुण पूर्ववयांतच दिसूं लागलेले असावेत. सद्गुण आणि दुर्गुण हे एकदम कांहीं आकाशांतील पावसाप्रमाणे कोसळून पडत नाहींत, ते अंतःकरणांत असतातच. अभ्यासाने परिणत होतात इतकेंच, दुर्गुण घालविणें आणि सद्गुण आपलासा करणें हें प्रौढपणीं अशक्य नसले तरी अवघडच असतें; हणून " तारुण्यींच उठाउठी " विद्यार्थ्यांनी सद्गुण संपादन