पान:विद्यार्थि धर्म.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें. ]
साधन - विचार.

१९


ह्मणून शरीरबल पंचवीस वर्षे वयाच्या आतच अवश्य मिळविलें पाहिजे.

 (२) विद्यार्थिदशेत विद्यार्थ्यांनी संपादन करण्याचें दुसरें साधन हाणजे बुद्धिबल हैं होय. मनुष्य हा बुद्धिमान् प्राणी असल्या- मुळे त्यानें आपल्या बुद्धीचा मोठा उपयोग करून घेतला पाहिजे. त्या असंस्कृत बुद्धीवर चांगल्या प्रकारचा संस्कार व्हावा ह्मणूनच निरनिराळ्या प्रकारच्या विषयांचा अभ्यास करावयाचा असतो. सुसंस्कृत मन व प्रगल्भ बुद्धि याच गोष्टी विद्यार्थ्याला मिळवावयाच्या असतात. बुद्धिबलाशिवाय शरीरबल व्यर्थ आहे. किंबहुना हीं दोन्हीं बलें परस्पर पोषक आहेत. नुसतें डोर्के मोठे असले किंवा अक्कल बिलकूल नसतां शरीर मात्र हमजीखानासारखें नुसतें गलेलठ्ठ असले तर तीं दोन्हीं निरुपयोगीच होत. जगांत जीं मोठीं मनुष्यें होऊन गेली त्यांच्या ठिकाणीं हीं दोन्हीं बलें होतीं यांत संशय नाहीं. फार कशाला ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांच्या जवळ काय होते ? निबंधमालाकारांच्या भाषेत बोलावयाचें ह्मणजे भरभक्कम लोखंडासारखें शरीर आणि विशाल बुद्धिमत्ता, बुद्धीमध्ये निरनिराळे विषय ग्रहण करण्याची आणि धारण करण्याची शक्ति अवश्य पाहिजे. हिंदुस्थान देश हा शिक्षणामध्ये मागसलेला आहे. पद्धतशीर विचार करण्याची सवय फार थोड्यांनाच आहे. ह्मणजे एकंदरीत बुद्धिबलाचा अभावच आहे असें मात्र नव्हे. बुद्धीमध्ये विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य आहे. हिंदुस्थानांतल्या कांहीं कांहीं जाती तर अत्यंत बुद्धिमान् आहेत. सर्व सामान्य जनता मात्र अडाणी आहे. याकरितां बुद्धिमान् विद्यार्थ्यांनीं आपलें बौद्धिक सामर्थ्य वाढवून इतरांना शहाणे केलें पाहिजे. बुद्धिबल हैं एक मानवी जीविताला अवश्य असें साधन आहे. तात्पर्य:-

बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धि वांकेल ॥
घेईल ज्या गुणाला तो गुण मति वेटुनीहि फांकेल ॥