पान:विद्यार्थि धर्म.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
विद्यार्थि-धर्म

[ प्रकरण


मूळ आहे. 'शीर सलामत तो पगड्या पचास' या झणीप्रमाणें शरीर आहे तरच सर्व आहे. सर्व संपत्तीमध्ये शरीरसंपत्ति ही सर्वांत श्रेष्ठ गणलेली आहे. पण दुर्दैव असे की आपल्या राष्ट्राच्या इतर संपत्तीच्या म्हासाबरोबर शरीरसंपत्तीचाही नाश होत चालला आहे. विद्यार्थ्यांना भावी कालांत जो संग्राम करावयाचा आहे, त्याचें शरीराचा दणकट- पणा हें मुख्य साधन आहे; हे विसरून चालावयाचें नाहीं. शरीरयष्टि चांगली भरभक्कम आणि मजबूत करण्याकडे विद्यार्थ्यांनीं अवश्य लक्ष्य दिले पाहिजे. हल्लीचे अभ्यासचक्र असलें कांहीं बिलंदर आहे की ते एकदां विद्यार्थ्यांच्या डोक्यावर फिरूं लागले हाणजे त्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष्य करण्याचीच बुद्धि होते. बुद्धच्या पोटांत ठराविक पुस्तकें ठराविक मुदतीत घुशीचे बीळ जसें ठेंचून भरतात त्याप्रमाणें कोंबावयाची असल्यामुळे त्या बिचाऱ्यांना इकडे तिकडे पहावयासही अवसर असत नाहीं. पण याहिपेक्षां वाईट गोष्ट अशी की विद्यार्थ्यांची मनःप्रवृत्ति पुस्तकाबाहेरच्या जगाकडे बिल-कुल पाहूं इच्छित नाहीं. जगांतल्या निरनिराळ्या उलाढाली, घडा- मोडी यांच्या प्रत्यक्ष व्यवहाराच्या साधनानें जे शिक्षण मिळतें आणि जी एक शारीरिक व बौद्धिक उन्नति होते तिचा फायदा विद्यार्थ्यांना मिळत नसल्यामुळे ते अशक्त, रोगी, खुजे व वामनमूर्ति असे होतात. आईबाप आणि शिक्षक यांचें लक्ष्य विद्यार्थ्यांच्या परीक्षांकडे असतें, त्यामुळे तिकडूनही शरीरबलाची प्रेरणा विद्यार्थ्यांना होत नाहीं. वास्तविक आईबापांनी आणि शाळेतील गुरुजनांनीं शरीर- बलसंवर्धनाची आवड विद्यार्थ्यांत उत्पन्न केली पाहिजे ती आवड तर उत्पन्न होत नाहीं; परंतु खेळण्या बागडण्याची जी सहज प्रवृत्ति तिच्यावरही विरजण घालण्यांत येतें. विद्यार्थ्यांनीं शरीरवळ कसे कमवावे कोणकोणते व्यायाम करावे याचा विचार आहझी पुढें व्यायाम या स्वतंत्र प्रकरणांत करणार आहोत, येथे विद्यार्थ्यांनी इतकेच लक्ष्यांत ठेवावें कीं बुद्धिसामर्थ्य हें सवय ठेविली की हळूहळू प्रौढपणींच बळावते. पण शरीरबलाचें रोपर्डे पूर्ववयांतच चांगले जोमदार होते.