पान:विद्यार्थि धर्म.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिसरें.]
साधन - विचार.

१७


तर देवाला दोष देण्यापेक्षां स्वतःच्या कर्मालाच दोष देणें रास्त नव्हे काय ? पुष्कळांना लहानपणचे दिवस हलगर्जीपणांत आणि Sasha गेल्याचा पस्तावा होतो; पण या कामांत दीर्घ सूचना ठेवून " आगे बुद्धि वानिया " याचाच अवलंब "पीच्छे बुद्धि बामनिया " यापेक्षां करणें इष्ट आहे. लष्करांत नोकरी पाहिजे, शिकारमास्तर होण्याची अनावर इच्छा आहे; पण अशा माणसाचें पूर्व आयुष्य सोवळे भांडें खाकोटींत मारून सहस्र भोजना- कडे धांव घेण्यांतच जर गेलें असले तर उपयोग काय ? पेशवाईंत एक अंताजी माणकेश्वर या नांवचे हरदास बुवा होते, पुढे शेवटच्या रावबाजीच्या कारकीर्दीत हे राज्यकारभार करूं लागले. पण हे बुवा कसला कारभार करणार ! यांचा कारभार अंताजी माणकेश्वरी झाला !! निष्कर्ष इतकाच कीं साध्यसाधनांचे मधुर मीलन झालें तरच विद्यार्थ्याच्या आयुष्यांत त्यांना नराचा नारायण " बनण्याचा अधिकार येतो. भिन्न भिन्न स्वभावामुळे कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची ध्येयें भिन्न भिन्न असणे अपरिहार्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या साध्याला कोणकोणती साधने लागतात आणि तीं त्याने कशी मिळवावी, याचा यथास्थित विचार विस्तारभया- स्तव आणि इतर कारणांस्तवहि शक्य नाहीं. फक्त प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतेंही साध्य साधण्याला जी जरूरीचीं साधनें हाणून पाहिजेत त्या सर्व सामान्य व सर्वस्पर्शी साधनांचा विचार या प्रकरणांत करणें शक्य आहे, हाणून आतां तिकडे वळतो.

 (१) विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत पहिले साधन शरीरवळ हें संपादिले पाहिजे. “ शररिमाद्यं खलु धर्मसाधनम् " ही महाकवि कालिदासोक्ति किंवा “ Sound body sound mind" ही इंग्रजी ह्मण विद्यार्थ्यांना परिचित आहेच. याशिवाय " बळी तो कान पिळी " " ज्याच्या मनगटांत जोर तो शिरजोर " या हाणी, फार काय पण भगवान् श्रीकृष्णाच्या तोंडचें “ बलं बलवतामस्मि "हेंगी वाक्यही शरीरबलाचेंच महत्व दर्शवितें, शरीरवल हें सर्व पुरुषार्थी