पान:विद्यार्थि धर्म.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


जन्महेतु आणि शिक्षक ह्मणजे केवळ उदरंभरणदृष्टि * असें अस- ल्यामुळे हिंदुस्थानच्या तरुण पिढीची दुर्दशा होत आहे. क्षुद्रवासना अल्पसंतुष्टपणा, मात्सर्य आणि एकांडे शिलेदारपणा या दुर्गुणांच्या वादळांत सांपडलेले शिक्षक व आईबाप विद्यार्थ्याच्या डोक्यांत काय भरवितील याचा नेम नाहीं. तथापि तरुण विद्यार्थ्यांनी या सर्व आपत्तींना तोंड देऊन, देश, काल, परिस्थिति लक्ष्यांत घेऊन आपलें साध्य ठरविले पाहिजे. - साध्यानुरूप साधनें कोणकोणती वतीं कसकशी मिळवावी याचा विचार पुढील प्रकरणांत करू.

____________
प्रकरण तिसरें.
साधन - विचार.

 दुसऱ्या प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आयुष्याचे ध्येय अथवा साध्य निश्चित केल्यावर साध्यानुरूप साधनाची जमवा- जमव करावी. साध्य आणि साधनांचा योग्य मिलाफ झाला ह्मणजे साध्य योग्य वेळी हस्तगत होते, सान्य एक आणि साधन भलतेच असा पुष्कळ प्रकार पुष्कळ विद्यार्थ्याच्या आयुष्यांत दिसतो. आज एक धंदा तर उद्यां दुसराच धंदा परवां आणखी कांहीं असे तेरड्याचे रंग दररोज बदलत गेले ह्मणजे आयुष्य फुकट जाते व एका व्यवसायांत तपश्चर्या होऊन जो अधिकार मिळावयास पाहिजे तो मिळत नाहीं. चांगला आवाज आहे, लहानपणीं गायनाकडे लक्ष्य दिले नाहीं, आणि प्रौढपणी कीर्तनकार होण्याची किंवा गवई होण्याची हुक्की आली तर त्याचा काय उपयोग ? लहानपणीं शरीर- सामर्थ्याकडे दुर्लक्ष्य केले आणि प्रौढ वयांत उन्हातानांत फिरण्याचे आठ आठ दहा दहा तास उभे रहाण्याचे काम जर नशीबी आलें


  • टीपः -- याला अपवाद ह्मणून कांहीं पालक व शिक्षक सांपडतील