पान:विद्यार्थि धर्म.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें.]
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.

१५


'यावदादित्यस्तपति यावद्भ्राजतिचंद्रमाः । यावत्प्लवायते वायुस्ताव- जीवजयायच ' ॥ या श्लोकांत सांगितल्या प्रमाणें जय मिळवि- ण्याकरितां यापुढें जगावयाचें आहे आणि तें यावच्चंद्रादि- वाकरौ कीर्तिदेहाने जगायचे आहे, हें विद्यार्थ्यांनी लक्ष्यांत ठेवावे. हिंदू संस्कृति ही मनुष्याला उच्च ध्येयाकरितां जग, असेंच सांगते. क्षुद्र विषयसुखें, मानापमान, मोठेपणा यांच्या पलीकडे दृष्टि पोंचवून उच्च ध्येय साधण्याकरितां जीवित तृणवत् मानले पाहिजे. जीविताकरितां जीवित नाहीं. तें स्वराज्य, साम्राज्य, ब्रह्मानुभव अशाकरितां आहे. आत्मा अमर व देह नश्वर हा सिद्धान्त, ध्येय एका जन्मांत हस्तगत न झाले तर अनेक जन्म घेऊन तें प्राप्त करून घे पण अर्धे सोडूं नकोस, हाच उपदेश करीत आहे. या उपदेशाप्रमाणे उच्च व स्पष्ट ध्येय, आणि त्याकरितां अहर्निश दीर्घोद्योग विद्यार्थ्यामध्ये दिसावयास नको काय ? विद्यार्थिदशेत दुर्गुण, दुरिच्छा, दुष्ट संवयी यांच्यावर जय मिळवून नंतर सामाजिक, धार्मिक, राजकीय हितशत्रूंवर जय मिळवावयाचा- आणि तो वयाच्या शंभर वर्षांपर्यंत जगून धडपड करून मिळवाव याचा असे सर्व विद्याथ्र्यांना हिंदुसंस्कृति सांगत आहे. राष्ट्रांतील विद्यार्थ्यांनी आपण राष्ट्रीय सभेनें ठरविलेले ध्येय हस्तगत करणार, शंभर वर्षे जगणार, अंतर्बाह्य शत्रूवर जय मिळविणार आणि त्या- करितां एका दिशेनें, अमुक एका क्षेत्रांत अखंड कार्य करीत राह- णार, असेच ठरविले पाहिजे. विद्यार्थ्यांनीं पोटाव्यतिरिक्त असे कांहींच ध्येय न ठेविले तर त्यांच्या आयुष्यांतील स्वारस्य जाणार आणि त्यांच्या आयुष्याला सहारा वाळवंटाची दशा प्राप्त होणार !

 येथे जातां जातां हेंही सांगितलें पाहिजे कीं, विद्यार्थ्याच्या आयुष्यांचे ध्येय ठरविण्याचे काम पालक व शिक्षक हेही जबाबदार आहेत; मात्र ते लहानपण आहेत. आईबापांनी विद्यार्थ्यांच्या मनावर लहाणपणीं चांगले संस्कार केले तरच पुढील आयुष्यांत त्यांचे कल्याण होईल. पण हिंदुस्थानांतील आईबाप हाणजे केवळ