पान:विद्यार्थि धर्म.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


झटली ह्यणजे खराज्य ही होय. हिंदी राष्ट्रांतील तरुणांपुढे एवढे मोठे उदात्त ध्येय असतां ' उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे ' असा प्रकार का व्हावा ? वास्तविक उच्च आणि उदात्त असें हें ध्येय काबीज करण्याकरितां प्रबळ महत्वाकांक्षेने पुष्कळ तरुण पुढे सरसावले पाहिजेत; परंतु अद्याप तसें दिसत नाहीं, याचे कारण त्यांचें अज्ञान हैं होय. हिंदी राष्ट्राच्या ध्येयाशी समरस होऊन राष्ट्राच्या सर्वागीण उन्नतीकरितां आपणास जेवढे जबरदस्त श्रम करितां येतील तितके करण्याची महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. नैराश्यवाद फेंकून दिला पाहिजे. निरुत्साहीपणा टाकला पाहिजे. " कसें करूं काय करूं " या मंत्राची हकालपट्टी केली पाहिजे. ज्या ईष्येंनें व भावनेनें चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्या- करितां मराठे चहूंदेश आक्रमण करीत होते, त्याच जोमानें निरनिराळे कार्यव्याप अंगावर घेण्यास तरुणांनी पुढे झालें पाहिजे. श्रीसमर्थ रामदास स्वामी ह्मणतात त्याप्रमाणें "उदंड उपासनेची कामे । लावीत जावीं नित्य नेमें किंवा "अभ्यासचि प्रगट व्हावे । ना तरी गुप्तचि असावें ॥ " हैं तत्व लक्ष्यांत बाळगून ज्या ज्या शाखेत आपल्याला उत्तम काम करितां येईल ती ती शाखा विद्यार्थ्यांनी ठरविली पाहिजे. सहस्रभोजनामध्ये एकट्या व्यक्तीला सर्व पंगती कांहीं वाढतां येणार नाहींत, हाणून त्याने एक पंगत आपल्या वांटणीस घेतली पाहिजे, ह्मणजे काम सोपें जाते. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वाकाय-विषयक निरनिराळीं कामें निरनिराळ्या लोकांनीं वांटून घेतली पाहिजेत. हिंदुस्थानचे साध्य स्वराज्य, त्याची साधनें अनेक, मी त्यांपैकीं अमुक एक साधन हस्तगत करीत मरणार, अशा निर्धाराचे तरुण निपजले पाहिजेत. ह्मणून विद्यार्थ्यांनी आपले कार्य व ध्येय निश्चित ठरविले पाहिजे, नोकऱ्यांच्या चलचलाटीचा काळ आतां गेला आहे. मेषपात्र वृत्ति सोडण्याचे दिवस आतां आले आहेत. 'काकोऽपिजीवतिचिराय बलिंच भुंक्ते' अशा वृत्ति आतां मारून टाकल्या पाहिजेत.