पान:विद्यार्थि धर्म.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें.]
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.

१३


लेला आणि मळलेला असा स्वराज्य-संपादनाचा धोपट मार्गही स्पष्ट आहे. हिंदुस्थानच्या भाग्यवान् तरुणांचे उच्चीचे ग्रह आज त्यांच्यापुढे अनेक प्रकारची कामे यशस्वी करण्याकरितां ठेवीत आहेत. स्वराज्य रक्षणापेक्षां संपादनाची किंमत जास्त आहे. स्वराज्य-संपादनाकरितां जितका स्वार्थत्याग करावा लागतो, त्या मानाने पुढच्या स्वास्थ्याच्या काळांत तो कमी होतो असें वाटतें. घरगुती व्यवहारांत कांहीं जोडीचे तर कांहीं मोडीचे दिवस अस- तात. मोडीच्या दिवसांत घरांत जे कांहीं असेल नसेल ते मोडून जगावयाचे असते. हिंदी राष्ट्राला आज त्यागाच्या व स्वावलंबनाच्या तत्वावर उभे राहावयाचे आहे आणि स्वराज्य मिळावावयाचे आहे; ही गोष्ट सूर्यप्रकाशवत् सिद्ध आहे. हिंदुस्थानच्या तरुणांनी पक्के लक्ष्यांत ठेवावें कीं, राष्ट्रामध्ये अनेक कार्ये आपल्या करितां वाट पहात आहेत. फक्त कोणते कार्य, किती स्वार्थत्याग व किती शरीर- सामर्थ्यं पाहिजे यांचाच विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. हिंदुस्थानास काय पाहिजे, असे कोणी विचारल्यास, हिंदुस्थानाजवळ आहे काय, असा उलट प्रश्न करितां येईल ! कारण हिंदुस्थानांत हिंदुस्थानांतल्या व जगांतल्या निरनिराळ्या व्यवहारांत पडून ते व्यव- हार सिद्धीस नेणारी जोमदार कर्ती माणसे पुष्कळ पाहिजे आहेत. त्यांनीं चढ़ाईनें आपआपलीं कार्ये सिद्धीस नेली पाहिजेत. लेखक, वक्ते, कवी, वीर, मुत्सद्दी, उपदेशक, धर्मप्रणेते, व्यापारी, संशोधक, शिल्पशास्त्री, गवई, शेतकरी, असे एक ना दोन अनेक प्रकारचे लोक राष्ट्रास पाहिजे आहेत, मात्र त्या सर्वांची इच्छाशक्ति एकवटून त्यांचा स्वराज्याचा काम उपयोग झाला पाहिजे.

 हिंदुस्थानच्या महासभेनें आतां राष्ट्राचेच ध्येय निश्चित केले आहे. व्यष्टी आणि समष्टी यांच्या हिताचा विचार करतां समष्टिहितांत व्यष्टिति गतार्थ होते; हाणून राष्ट्रांतील तरुणांनी राष्ट्रीय ध्येयाशींच आतां एकरूप होऊन गेले पाहिजे. हिंदुस्थानावर आलेल्या सर्व आपत्तींचे निरसन एकाच गोष्टीने होणार आहे, आणि ती गोष्ट