पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


आपल्या ध्येयाचा विचार करण्यास लागले पाहिजे.विसावे वर्षी जरी ध्येय निश्चित ठरलें तरी पंचविसाव्या वर्षापर्यंत साधन सामुग्री जुळवितां येते. कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्यांनीं निदान वयाच्या सव्विसाव्या वर्षी उद्योगास लागलेच पाहिजे. आमच्या मतें इतर देशांच्या मानानें ही वयोमर्यादा जास्तच आहे. कारण . हिंदुस्थानच्या लोकांच्या आयुष्याचा विचार करितां सव्विसाव्या वर्षी तारुण्य अतिक्रांत होते. जगांत जी कृर्तृत्ववान् माणसें झाली त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी विशीवाविशीच्या सुमारासच धकाधकीच्या मामल्यांत उड्या टाकल्याचें दिसेल. फार कशाला, आपल्या मराठ्यांच्या इतिहासाकडे पाहिलें तर बाजीरावानें बावी- साव्या वर्षी, नानासाहेवानें एकोणीसाव्या वर्षी, थोरल्या माधव- रावानें सतराव्या वर्षी पेशवाईचे कारभार हातीं घेतले होते. विश्वासराव तर वयाच्या सोळाव्या वर्षीच मोठमोठ्या मोहिमा करूं लागला होता. लॉर्ड लैव्हचेंही उदाहरण असेच आहे. १७८४ मध्ये ज्या तरण्या जवानानें इंग्लंडच्या मुख्य प्रधानकीची सूत्रे हाती धरलीं तो तेव्हां अवघ्या तेवीस वर्षांचा होता. सारांश तारुण्याच्या जोमांत तडकाफडकीने व बेगुमानपणे जें काम होतें तें पोक्तपणांत होत नाहीं. समर्थ रामदास स्वामींची नजर विशीबावशीच्या तरुणां- वरच होती. मुख्य मुद्दा इतकाच की, अपवाद ह्मणूनच कांहीं उदाहरणे सोडून दिली तरी पंचवीस सव्वीसाव्या वर्षी हिंदुस्थानच्या प्रत्येक विद्यार्थ्यानें मनुष्य बनून कामास लागले पाहिजे. मनुष्य बनून अर्से ह्मणण्याचे कारण विद्यार्थ्यांना पुस्तकसृष्टीच्या बाहेरची प्रत्यक्ष व्यवहारसृष्टी माहीत नसते. विद्यार्थ्यांनी काय वाटेल ते करून सव्वीसाव्या वर्षी कामास लागा- वयाचे असा निर्धार केला तरच यापुढे हिंदुस्थानाच्या उद्धाराची कांहीं तरी आशा आहे.

 एका दृष्टीने हिंदुस्थानांत नैराश्याच्या अरण्यांत ध्येयाची वाट चोखाळणे जसे कठीण आहे, तसेच त्याच अरण्यांत थोडासा रुळ-