पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें.]
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.

११


मनानें एक विशिष्ट ठरवितो आणि ती किंमत आली नाहीं कीं, ज्या वकीलांना पैसे मिळत असतात त्यांचा तो मत्सर करित बसतो. परिस्थितीचा, आपल्या कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा किंवा गुणावगुणांचाहि विचार न करितां केवळ कुतर्काभ्यास करण्यांत चांगलीं शिकलीं सवरलेली माणसें दंग झालेली पाहून खेद वाटतो ! एल. एल्. बी. झाल्यावर वकीलीच करण्याची आणि ताँत इतके पैसे मिळालेच पाहिजेत, असा एकदां ग्रह बनलेला असतो तो तर सिद्धीस जात नाहीं व दुसरें कांहीं तरी करणें हलके वाटतें किंवा मनाला हलके न वाटलें तरी शरीरामध्यें तें करण्याची पात्रता नसते. कारण, पाहिजे तें करणें, व तें भांग मोडून करणे यांची संवय त्या शरीराला नसते. शेवटी अपेक्षेप्रमाणें पैसा नाहीं, हाणून संसारही नीट नाहीं. शारीरिक दुर्बलतेमुळे देशकार्यही नाहीं, असा प्रकार होऊन अखेर "इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः " हा परिणाम होतो.

 वरील उदाहरणे देण्याचा उद्देश इतकाच कीं, विद्यार्थिदशेमध्यें ध्येय अथवा साध्य ठरलेलें नसतें. जें ठरलेलें असतें, तें प्रवाहपतित असतें. बी. ए. व एल्. एल्. बी. होऊन नोकरी करणें व वकीली करणें या ध्येयांत परिस्थितिमुळे आतां बिलकुल जिवंतपणा उरलेला नाहीं, वेदशास्त्रशाळेंत जे प्रौढ विद्यार्थी शिकत असतात, त्यांच्या पुढेही कांहीं परतंत्र राष्ट्रांतील तरुणांना साजेसें ध्येय नसतें. पुराण, कीर्तन व शास्त्र पढविणें ह्रीं ध्येयें मेलेलीं असल्याप्रमाणेंच आहेत. त्यांत नवीन अभिनिवेश, नवीन आक्रम, नवीन चढाई, मिशन प्रमाणें कां होईना, पण धार्मिक जयिष्णुवृत्ति कुठेही आढ- ळत नाहीं. व्यापार, डॉक्टरी, कारखाने, कंत्राटें, शेतकी, सराफी अशा निरनिराळ्या व्यवहारांत असणाऱ्या तरुणांनीही त्या शाखें- तील उच्च ध्येय दृष्टीपुढे ठेवलेलें नसतें, मनुष्यानें आपलें साध्य एकदां निश्चित केलें कीं, मग तो साधनेही शोधूं लागतो. साध्य निश्चित ठरल्याशिवाय साधनें ठरत नाहींत ह्मणून सर्व विद्यार्थ्यांनीं वयाच्या सोळा सतरा वर्षांपासून ह्मणजे सामान्य शिक्षण झाल्यानंतर