पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 याचा सारांश - पाऊस उत्तम पडो, नद्या भरून वाहोत. शेतें उत्तम पिंकूं देत. मातभाकरी व दुधदुभतें आह्मांस रगड मिळावें. २ अन्न ( भात ) हें फार थोर आहे असे म्हणतात. अन्न सर्वांचें पोषक आहे; तें मनुष्याला संपत्ति देतें.

ब्रम्हार्पणं ब्रम्हहविर्ब्रम्हानौ ब्रम्हणा हुतम् ।
ब्रम्हैव तेन गंतव्यं ब्रम्हकर्म समाधिना ॥ [ गीता.

 ज्या साधनाने होम करावयाचा, ज्याचा होम करायचा, ज्या अम्मीमध्यें होम करावयाचा, आणि जो होम करितो ते सर्व पदार्थ ईश्वररूप ब्रम्हरूप आहेत असें जो समजतो, तात्पर्य सर्वच कर्म ईश्वररूप आहे अशी भावना जो नित्य ठेवतो, त्याला ईश्वरप्राप्ति होते.

जनीं भोजनीं नाम वाचें वदावे ।
अती आदरें गद्य घोषे म्हणावें ॥
हरीचितनीं अन्न सेवीत जावें ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥ [ समर्थ.
वदनिं कवल घेता नाम घ्या श्रीहरीचें
सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें ॥
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥ [ पंडित.

_________