पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राप्त व्हावें. किंबहुना शंभर वर्षापेक्षां अधिक आयुष्य मिळून यांत अशाच गोष्टी व्हाव्या.
 ६ शंभर वर्षांच्या आयुष्यांत आम्हांस ऐश्वर्य मिळत असावे. शंभर वर्षांच्या आयुष्यांत आह्मांस सुख मिळत असावें. शंभर वर्षांच्या आयुष्यांत आप्तइष्ट, पुत्रपौत्र यांची समृद्धि व्हावी. शंभर वर्षांच्या आयुष्यांत आह्मी सर्वांपेक्षां सर्वगुणांत वरचढ व्हावें.
 ७ परमेश्वराची आज्ञा आहे कीं तुह्मांसर्वांचे विचार, बुद्धि व मन एकसूत्री राहूं देत. यामुळे तुमचा समाज एकजीव होऊन ऐश्वर्यवान् होईल.
 ८ परमात्मन् ! या राष्ट्रांत ब्राह्मणवर्ण तेजस्वी व विद्वान् होवो. क्षत्रियवर्ण अचुक निशाणबाज, धाडसी व युद्धकुशल होवो. गाई दुधाळ, बैल बळकट, घोडे चपळ, स्त्रिया पतिव्रता, लढवय्ये जयिष्णु, तरुण आपल्या विद्वत्तेची व वक्तृत्वाची सभे वर छाप पाडणारे असे होवोत. नागरिकांना सत्पुत्र होवोत. योग्य वेळी पाऊस पडो. शेतें उत्तम पिंकूं देत, व आमच्या राष्ट्राचा योगक्षेम उत्तम चालू दे.
 ॐ शांतिः शांतिः शांतिः ही शांति प्रत्येक मंत्राचे शेवटी ह्मणावी. हिचा अर्थ सर्वत्र शांतता स्वास्थ्य व समाधान असावें, असा आहे.
 प्रत्येक विद्यार्थ्याने भोजनापूर्वी ह्मणावयाचा मंत्र.
 १ यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पला ओषधयो भवन्तु । अन्नवतामदिनवतामामिक्षवताम् । एषा राजा भूयासम् । २ ओदनमुदुवते परमेष्ठीवा एषः । यदोदनः । परमामेवैन श्रियं गमति ।