पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युवा । अस्य यजमानस्य वीरो जायताम् । निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु । फलिन्यो न ओषधयः पच्यन्ताम् । योगक्षेमो नः कल्पताम् ।
॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः

मराठी भावार्थ.

 १ ज्या परमेश्वराला सर्व बाजूला डोळे, तोंड, हात, पाय आहेत, (अर्थात् आपण कोणास न कळत कांहीं केलें तरी ईश्वर ते पहातोच ) जो बाहूपासून स्वर्ग, पायापासून पृथिवी हीं उत्पन्न करितो, तो स्वर्ग पृथिवी इत्यादि सर्व जग उत्पन्न करणारा परमात्मा एकच आहे.
 २ सर्व शक्तिसंपन्न असा जो परमेश्वर माझ्या हृदयांत प्रवेश करून जड अशा वाणीला व हातपाय कान त्वचा आणि प्राण इत्यादिकांना प्रेरणा देतो, त्या भगवंताला माझा नमस्कार असो.
 ३ भगवान् इंद्र मला स्मरणशक्ति, मुलेबाळें आणि इंद्रिय- सामर्थ्य देवो भगवान् अग्नि मला स्मरणशक्ति, मुलेंबाळें व विचारशक्ति देवो. भगवान् सूर्य मला स्मरणशक्ति, मुलेबाळे व तेजस्विता देवो.
 ४ परमात्मन् ! आह्मां गुरुशिष्यांचें रक्षण कर. दोघांसहि ऐश्वर्य दे. दोघांकडून मोठे पराक्रम होऊं देत. आमचें ज्ञान तेजस्वि रहावें; आणि आमच्यामध्यें नित्य प्रेमभाव राहो. हे परमेश्वरा ! सर्वदा शांति असो.
 ५ शंभर वर्षांच्या आयुष्यांत जगापासून आह्माला ज्ञान प्राप्त होवो. शंभर वर्षांच्या आयुष्यांत आह्मी जगाला ज्ञान देत रहावें. शंभर वर्षांच्या आयुष्यांत आम्हांला कधीं दैन्य न