पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वातंत्र्याची भूपाळी.

रक्षरक्ष ईश्वरा भारता प्राचीना जनपदा ।
भोगियली बहु जये एकदा वैभव सुख संपदा ||धृ० ॥
सगरद्वीपानी सिंधु तो काश्मीरापासुनी ।
कृष्णकुमारीकडे शांतिर्चे राज्य देइ पसरुनी ।
प्रेमभाव धरुनिया पुत्र हे ऐक्य करुत झडकरी |
कर्तव्या जागुनी करूंदे कर्तव्यें हीं खरी ।
शाश्वत सत्य ज्ञानदिवाकर उगवो हृदयांतरी ।
धर्मतेज देखनी चकित हो देववृंद अंबरी ।
गाढतमी बुडत राष्ट्र हैं उद्बोधन या करी ।
कृपाकटाक्षे पुन्हां चहूं दे वैभव शिखरावरी ।
रोमरंधिं चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा ! ।
सात समुद्रांबरी फडकुं दे यशोध्वजा सुंदरा |
हे पार्थ सारथे ! हे कंसारि विजयवंता !
हे एकवचन रामा ! हे धनुर्धरानंता !
सोडिन यास विपदा हा काळ असे पड़ता ।
आर्यपुत्र जरि अपात्र दिसले घ्याया स्वीया पदा |
रक्ष भारता सहायहीना ईशा ! चिरसौख्यदा ॥ १ ॥
 रक्ष रक्ष ईश्वरा भारता प्राचीना जनपदा ।
भोगियली बहु जयें एकदा वैभव सुखसंपदा ||

 सूचना - पहाटे वेळ असेल त्याप्रमाणे अशाच इतर भूपाळ्या व करुणाष्टके म्हणण्याचा भक्तिमार्गप्रदीप व नवनीत या ग्रंथावरून परिपाठ ठेवावा.