पान:विद्यार्थि धर्म.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावें. ]
तरुण पिढी च खेडींपाडी.

१५५


बसल्या चारआठ आणे मिळतील, शेतकन्याप्रमाणें गांवांतले इत- रहि लोक पुष्कळच रिकामे असतात. त्यांनीही वसल्याबसल्या हा उद्योग केल्यास त्यांत त्यांचे हितच आहे, पण खेड्यांतील सुशिक्षित प्रतिष्ठित माणसांनी याबद्दल सक्रिय प्रयत्न केले पाहिजेत. नुसत्या तोंडपाटिलकीनें लोकांची प्रवृत्ति बदलणार नाहीं. राष्ट्रांतील लोक निरुद्योगी व आळशी असणें सर्व दृष्टींनीं वाईट आहे. निरुद्योगी, आळशी आणि रिकामटेकड्या लोकांना व नसते धंदे करणारांना चरका हैं एक मोठें प्रतिबंधक होईल. चरक्याच्या प्रसाराबरोबर खादीचाही प्रसार होईल. लोक हौसेने खादी वापरू लागतील. व स्वतः सूत कांतून तयार केलेला कपडा वापरण्याची इच्छा वाढेल. सुताची निपज जास्त होऊं लागली तर विणकरीवर्ग वाढेल, आणि आज खादी जी महाग पडत आहे ती पडणार नाहीं. अस्पृश्यांच्या उन्नतीकरितांहि चरक्याचा पुष्कळ उपयोग होईल.
 उपसंहार. – पूर्वार्धाचे सिंहावलोकन आठव्या प्रकरणाच्या अखेरीस केलेच आहे. पहाटे उठल्यापासून रात्री निजेपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या व्यवहारांतील गोष्टींचा विचार पूर्वार्धात केला आहे. विद्यार्थिदशेचे महत्त्व समजून घेऊन आपले ध्येय साधण्याला दररो- जची प्रत्येक हालचाल कशी साधनीभूत आहे, हें त्यावरून विद्या- र्थ्यांना समजेल, उत्तरार्धात नाटकें, सिनेमा, कादंबन्या यांपासून कसा तोटा होतो, व्यवहारज्ञानाच्या अभावी कशी फजीती होते, व्यवहारज्ञान कसं महत्त्वाचें आहे, सुट्टीमध्ये प्रवास करून व्यवहाराचे व जगाचे निरीक्षण का व कसें केले पाहिजे, ब्रह्मचर्यनाशाच्या ज्या गोष्टी व संवय असतील त्या वर्ज्य कां केल्या पाहिजेत, यांचा विचार बारा प्रकरणांपर्यंत केला. स्वदेशाची थोरवी काय आहे, आपल्या मातृभूमीचें वैशिष्ट्य काय आहे, हें समजून घेऊन विद्यार्थिदशेतच स्वदेशसेवेचा ओनामा कसा गिरवावा याचे विवेचन तेरा व चौदा या प्रकरणांत केले, लेखकाला गांवठी, संस्थानीं, खाजगी, सरकारी, मिशनरी इंग्रजी शाळा, माजी समर्थ विद्यालय व प्राज्ञपाठशाळा